बहिरेश्वर ते कोगे पूल रस्त्याने घेतला मोकळा श्वास! बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न
कसबा बीड वार्ताहर
कोगे ते बहिरेश्वर कमानीपर्यंत गेली अनेक वर्षे रस्ता रुंदीकरण व रस्ता काम झालेले नाही. या रस्त्यावरून बहिरेश्वर, म्हारूळ , आमशी आदी बारा वाड्याना जाणारा रस्ता दुर्लक्षित आहे. तसेच कोगे ते बहिरेश्वर दरम्यान गावाला लागून असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा शेण व इतर अतिक्रमण झाले आहे, ही दैनिक तरुण भारत ही बातमी प्रसिद्ध झाली होती , याची दखल कोगे - बहिरेश्वर ग्रामपंचायत प्रशासन घेऊन बहिरेश्वर ते कोगे धरण दुतर्फा असणारे अतिक्रमण काढले आहे.जवळपास दोन ट्रक पास होऊ शकतील इतका मोठा रस्ता बहिरेश्वर ते कोगे धरणपर्यंत अतिक्रमण मुक्त केले आहे. तर कोगे ते कोगे धरण या रस्त्याचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला विटा, दगड, माती,झाडी , जनावरांच शेण, लाकडे कचरा गोट्यातील पालापाचोळा, खत, मुरूम टाकाऊ वस्तू यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण झाली होती आणि अपघात होत होते. तसेच मोठी अवजड वाहनांची वाहतूक कसरत करावी लागत होती. रंकाळा ते स्वयंभूवाडी एसटी बस , गंगावेश ते कोगे बहिरेश्वर केएमटी बस अनेक वर्षे बंद झाली आहे . त्यामुळे प्रवास करणारे महिलां, कामगार व विद्यार्थी यांचे हाल होत आहे.तसेच खेड्यातील भाजीपाला,दूध दही व इतर वस्तू शहरात विक्री करणारे व्यावसयिक यांना अडचण झाली आहे. या अडचणी दूर होण्यास याचा नक्कीच फायदा होईल.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असणारे अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या साह्याने पूर्ण केले आहे. जर या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण होणे गरजेचे आहे. आमशी व बारा वाड्यांना जाणारा जवळचा रस्ता होईल. तसेच रंकाळा ते स्वयंभूवाडी एसटी बस , गंगावेश ते कोगे बहिरेश्वर केएमटी बस कोगे मार्गे चालू करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या धडक मोहिम वेळी कोगे ग्रामपंचायतचे सरपंच बनाबाई यादव , उपसरपंच नामदेव सुतार, ग्रामसेवक डी.के आंबेकर, पोलिस पाटील दत्तात्रय मिठारी व सर्व सदस्य उपस्थित होते.
ऊस कारखान्याला वाहतूक करत असताना संबंधित रस्त्यावर अतिक्रमण असल्यामुळे अपघात घडत होते बहिरेश्वर ते कोगे धरण अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे व ग्रामस्थाचे आभार तसेच यापुढे या रस्त्याला लागून कोणीही वाहतूकीस अडचण होईल असे कृत्य करू नये अन्यथा कायरेशीर कारवाई केली जाईल असे बहिरेश्वर सरपंच सौ वंदना दिंडे यांनी सांगितले. यावेळी बहिरेश्वर ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामसेवक , सर्व सदस्य व पोलिस पाटील आदी उपस्थित होते.