बहादुरसिंग सागूची अध्यक्षपदी निवड
वृत्तसंस्था / चंदीगड
अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी आशियाई क्रीडा स्पर्धेतील गोळाफेकीत सुवर्णपदक मिळविणारे बहादुरसिंग सागू यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हे अध्यक्षपद अदिले सुमारीवाला भूषवित होते.
51 वर्षीय सागो आता 4 वर्षांच्या कालावधीसाठी अखिल भारतीय अॅथलेटिक फेडरेशनचे अध्यक्ष राहतील. बहादुरसिंगने 2002 च्या बुसानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. तसेच त्यांनी 2000 आणि 2004 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. बहादुरसिंग हे एएफआय अॅथलिटस् आयोगाचे सदस्य आहेत. अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये बहादुरसिंग आणि अंजू बॉबी जॉर्ज हे दोन उमेदवार होते. पण शेवटच्या क्षणी अंजू बॉबी जॉर्जने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने बहादुरसिंग यांची बिनविरोध निवड झाली. 67 वर्षीय सुमारीवाला यांनी अखिल भारतीय अॅथलेटिक फेडरेशनच्या अध्यक्षपदाची सुत्रे 2012 पासून सांभाळली होती. विश्व अॅथलेटिक फेडरेशनच्या कार्यकारी समितीचे सुमारीवाला हे विद्यमान सदस्य आहेत.
त्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत