महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बागान-पंजाब उपांत्यपूर्व फेरीची लढत

06:48 AM Aug 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

2024 च्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार मोहन बागान आणि पंजाब एफसी यांच्यात उपांत्यपूर्व फेरी गाठ पडणार आहे.

Advertisement

सध्या सुरू असलेल्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेतील एफसी गोवा आणि शिलाँग लेजाँग यांच्यातील फ गटातील शेवटचा प्राथमिक फेरीतील सामना शनिवार झाल्यानंतर उपांत्यपूर्व फेरीचा ड्रॉ काढण्यात आला. उपांत्यपूर्व फेरीसाठी एकूण 8 संघ पात्र ठरले आहेत. 2024 ची ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेला 27 जुलैपासून प्रारंभ झाला असून 31 ऑगस्टला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. एकूण 24 संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये नेपाळच्या एका विदेशी संघाचा समावेश होता. अ गटातून बागान आणि इस्ट बंगाल हे दोन संघ तर ब गटातून बेंगळूर एफसी तसेच क गटातून केरळ ब्लास्टर आणि पंजाब एफसी, ड गटातून इंडियन आर्मी तसेच ई गटातून नॉर्थ इस्ट युनायटेड आणि शिलाँग लेजाँग हे संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले आहेत.

21 ऑगस्टला नॉर्थ इस्ट युनायटेड व इंडियन आर्मी यांच्यातील पहिला उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळविला जाणार आहे. शिलाँग लेजाँग आणि इस्ट बंगाल यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीचा सामना 21 ऑगस्टला होणार आहे. मोहन बागान आणि पंजाब एफसी यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना 23 ऑगस्टला तर चौथा उपात्यपूर्व फेरीचा सामना 23 ऑगस्टला बेंगळूर एफसी आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यात होईल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article