For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बागान-मुंबई सिटी एफसी आज जेतेपदासाठी लढत

06:43 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बागान मुंबई सिटी एफसी आज जेतेपदासाठी लढत
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

2024 च्या इंडियन सुपर लिग फुटबॉल हंगामातील येथे सॉल्ट लेग स्टेडियमवर शनिवारी बलाढ्या मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी यांच्यात जेतेपदासाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे. या अंतिम सामन्याला 60 हजार पेक्षा अधिक प्रेषक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

2024 च्या फुटबॉल हंगामात मोहन बागान संघाने दमदार कामगिरीचे दर्शन शौकिनांना घडविले. बागान संघाने तब्बल 23 वर्षानंतर पहिल्यांदा ड्युरँड चषकावर आपले नाव कोरले. दरम्यान इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या मधल्या टप्प्यापर्यंत बागानचा संघ गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर होता. बागान संघाच्या नेतृत्वामध्ये बदल करण्यात आला. आणि जुआन फर्नांडोच्या जागी अँटोनियो हेबासकडे धुरा सोपविण्यात आली. हेबासच्या शानदार कामगिरीमुळे बागान संघाने पहिल्यांदा आयएफए शिल्ड फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. यानंतर बागान संघाने दोन आठवड्यांच्या कालावधी दरम्यान मुंबई सीटी एफसीचा 2-1 असा पराभव करुन आयएफए शिल्ड स्पर्धा पहिल्यांदा जिंकली. हा अंतिम सामना येथील सॉल्ट लेग स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. मोहन बागानचा संघ आता एका फुटबॉल हंगामात जेतेपदाची हॅट्ट्रीक नोंदविण्यासाठी सज्ज झाला आहे. मोहन बागानने एका फुटबॉल हंगामात 23 वर्षापूर्वी एका फुटबॉल हंगामात तीन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. 23 वर्षापूर्वी मोहन बागान संघाने वर्षभराच्या कालावधीत नॅशनल फुटबॉल लीग स्पर्धा, फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धा आणि कलकत्ता प्रिमियर डिव्हिजन लीग स्पर्धा जिंकल्या होत्या. तसेच बागानने इतर ठिकाणी झालेल्या सिक्किम गोल्ड चषक आणि बोर्डोलोई चषक स्पर्धा जिंकल्या होत्या. सध्या मोहन बागान संघाला सुब्रतो भट्टाचार्य यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

तीन वर्षापूर्वी मडगावमध्ये झालेल्या आयएसएल (इंडियन सुपर लीग) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबई सीटी एफसी संघाने मोहन बागानचा 2-1 असा पराभव केला होता. हा अंतिम सामना कोरोना महामारी समस्येमुळे बंदीस्त स्टेडियममध्ये खेळविला गेला होता. या मागिल पराभवाची परतफेड करण्यासाठी मोहन बागान संघाला शनिवारच्या अंतिम सामन्यात आपल्या डावपेचात बदल करुन आक्रमक खेळावर अधिक भर द्यावा लागेल. अनिवृद्ध थापा, जेसन कमिंग्ज, डिमिट्री पेट्राटोस आणि मनवीर सिंग यांच्यावर आक्रमणाची भिस्त राहिल. मुंबई सिटी एफसी संघातील विक्रमप्रताप सिंग, चेंगटे हे प्रमुख खेळाडू म्हणून ओळखले जातात. निलंबनाच्या कारवाईमुळे हॉलंडचा फुटबॉलपटू निफ याला या सामन्याला मुकावे लागणार आहे.

Advertisement
Tags :

.