For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शंकर नेत्रालयचे संस्थापक बद्रीनाथ यांचे निधन

06:01 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
शंकर नेत्रालयचे संस्थापक बद्रीनाथ यांचे निधन
Advertisement

चेन्नई :

Advertisement

शंकर नेत्रालयाचे संस्थापक डॉ. एस.एस. बद्रीनाथ यांचे मंगळवारी निधन झाले आहे. निधनासमयी ते 83 वर्षांचे होते. डॉ. बद्रीनाथ हे इंडियन आर्मी फोर्सेसचे एक नॉन-ऑफिशियल सदस्य होते. अनेक दशकांपर्यंत चॅरिटेबल आय केयर प्रदान करण्यासाठी बद्रीनाथ यांना 1983 मध्ये पद्मश्री तर 1999 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. तर अन्नामलाई आणि डॉ. एमजीआर मेडिकल युनिव्हर्सिटीने 1995 मध्ये त्यांना डॉक्टरेटच्या मानद पदवीने गौरविले होते .बद्रीनाथ यांनी 1978 मध्ये डॉक्टरांच्या एका समुहासोबत मिळून शंकर नेत्रालयाची स्थापना केली होती. शंकर नेत्रालय हे सर्वात मोठ्या आणि नॉन-प्रॉफिट हॉस्पिटल्सपैकी एक आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.