बदलापूर अत्याचार प्रकरण : तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे गृहमंत्र्यांचे आदेश
बदलापूर मधील शालेय विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार समोर आल्यानंतर आता मोठा जनतक्षोभ उसळला असून राज्य सरकार आता एक्शन मोडवर आले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्या प्रकरणी पोलिस आधिकाऱ्यांना आता निलंबित करण्यात आले आहे. यासंबंधीची माहीती राज्याचे गृहमंत्री देवंद्र फडणवीस यांनी दिली असून या मध्ये तीन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
बदलापूर येथे लहान मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर जनक्षोभ उसळेला आहे. बदलापूर शाळेच्या आवारात पालकांनी गर्दी करून शाळेची तोडफोड केली. त्यानंतर नागरीकांनी तसेच पालकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे ट्रॅककडे वळवत रल्वे मार्ग रोखून धरला. त्यामुळे बदलापूर रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे फेऱ्या रद्द झाल्या असून त्यामुळे दळणवळण विस्कळित झाले आहे.
राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी आंदोलकांनी गिरीष महाजन यांच्याकडे आरोपीला आमच्या ताब्यात द्या...नाहीतर त्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या अशी मागणी केली. त्यावर आंदोलकांनी जे शक्य नाहीत अशा मागण्या करू नयेत...हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्यात येईल...कायदाच आरोपीला शिक्षा करेल असे आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थिचीचा आढावा घेतला. हे प्रकरण समोर आल्यानंतरही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांना १२ तास ताटकळत ठेवणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश गृहमंत्र्यांनी ठाण्याच्या आयुक्तांना दिले असून यामध्ये गुन्हा नोंदवण्यास विलंब करणारे बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल अशा तीन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.