ओटीटीवर येणार ‘बडा नाम करेंगे’
सोनी लिव्हवर लवकरच ‘बडा नाम करेंगे’ ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. ओटीटीवर राजश्री प्रॉडक्शन्सचे याद्वारे पदार्पण होणार आहे. ही एक प्रेमकथेवर आधारित सीरिज असून यात केटुंबिक मूल्येही दर्शविण्यात येणार आहेत.
या सीरिजचे दिग्दर्शन पलाश वासवानी यांनी केले आहे. याचा टीझर जारी करण्यात आला असून यात प्रेम, परिवाराला जोडून एका कहाणीची झलक दाखविण्यात आली आहे. या सीरिजमध्ये ऋषभ आणि सुरभिची कहाणी असून ज्यांचे अरेंज मॅरेज भूतकाळातील गोष्टी समोर आल्यावर वेगळे वळण घेत असते. दोघेही स्वत:च्या नात्याबद्दल कोणता निर्णय घेतात यावर याची पूर्ण कहाणी बेतलेली आहे. ही सीरिज माझ्या मनात खास स्थान बाळगून आहे. याचबरोबर आम्ही नात्यांचे सौंदर्य, प्रेमाची खोली आणि कौटुंबिक मूल्यांच्या मजबुतीविषयी सांगत आहोत. सोनी लिव्हसोबत भागीदारी आमच्यासाठी आकर्षक अनुभव असल्याचे उद्गार सुरज बडजात्या यांनी काढले आहेत.
सीरिजमध्sय कंवलजीत सिंहृ अलका अमीन, राजेश जैस, चित्राली लोकेश, राजेश तैलंग, अंजना सुखानी हे कलाकार दिसून येणार आहेत. प्रेक्षकांना आता राजश्री प्रॉडक्शन्सकडून निर्मित सीरिज पाहण्याची पर्वणी लाभणार आहे.