महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर शिवाजीनगर क्रॉसजवळ कचरा साचल्याने दुर्गंधी

10:33 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

खानापूर-जांबोटी रस्त्यावरील शिवाजीनगर क्रॉसलगत गेल्या अनेक दिवसांपासून कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे हा परिसर अस्वच्छ झाला आहे.यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खानापूर शहरालगत वायव्य दिशेला 25 वर्षापूर्वी शिवाजीनगर वसाहत अस्तित्वात आली. खानापूर शहरालगत ही वसाहत असली तरी या वसाहतीचा समावेश जवळच्या रामगुरवाडी ग्राम पंचायतीत समावेश करण्यात आला आहे.खानापूर जांबोटी क्रॉसपासून अर्धा कि. मी. अंतरावर शिवाजीनगरला जाण्यासाठी वळण आहे. येथे वरचेवर कचरा टाकला जातो. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सध्या सर्वत्र डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article