For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुतगे-मुचंडी संपर्क रस्त्यावर कचऱ्यामुळे दुर्गंधी

10:15 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुतगे मुचंडी संपर्क रस्त्यावर कचऱ्यामुळे दुर्गंधी
Advertisement

ग्रा. पं.कडूनच कचार टाकण्याचा प्रकार : भटक्या कुत्र्यांचा वावर : शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेताला जाण्याची वेळ

Advertisement

वार्ताहर/सांबरा

मुतगे-मुचंडी या संपर्क रस्त्याच्या बाजूला मुतगे ग्रामपंचायतीकडून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. सध्या परिसरात दुर्गंधी पसरली असून तेथे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शेताला जावे लागत आहे. ग्रामपंचायतीकडून गावांमध्ये व उपनगरामध्ये संकलित केलेला कचरा मुतगे-मुचंडी संपर्क रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येत आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी या संपर्क रस्त्याशेजारी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी  एक प्रकल्प उभारण्यात आला होता. मात्र हा प्रकल्प तर सुरू झालाच नाही. सध्या या प्रकल्पाची इमारत वापराविना पडून असून शासनाचा लाखो ऊपयांचा निधी पाण्यात गेला आहे.

Advertisement

सध्या या प्रकल्पाच्या इमारतीसमोर व रस्त्याशेजारी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याशेजारी कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. हा कचरा आजूबाजूच्या शेतामध्येही पसरत असून तेथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. तेथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही नाक मुठीत घेऊन जावे लागत आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीने कचऱ्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. मात्र कचऱ्याची विल्हेवाट न लावता कचरा उघड्यावर रस्त्याच्या बाजूला टाकण्यात येत असल्याने ग्रामपंचायतीच्या या अजब कारभाराबद्दल ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनाअभावी येथील कचरा समस्या दिवसेंदिवस गंभीर बनू लागली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.