For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्या’ स्वीटमार्ट मालकाचे साहित्य परत

10:36 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘त्या’ स्वीटमार्ट मालकाचे साहित्य परत
Advertisement

बेळगाव : गणपत गल्ली येथील पुरोहित स्वीटमार्टला दिलेला गाळा महानगरपालिकेने ताब्यात घेतला. संबंधित मालकाने या गाळ्यातील आपले साहित्य काढले नाहीच. त्यामुळे महानगरपालिकेने ते साहित्य पंचनामा करून आपल्याकडे ठेवले होते. ते साहित्य बुधवारी संबंधित मालकाला परत देण्यात आले आहे. गणपत गल्ली येथे महानगरपालिकेचा गाळा लीजद्वारे पुरोहित स्वीटमार्ट चालकांना दिला होता. मात्र लीज  संपल्याने तो गाळा खाली करण्यासाठी मालकाला नोटीस दिली होती. न्यायालयानेही हा आदेश दिला होता. तरीही संबंधित मालक गाळ्याचा ताबा सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे मनपाने त्या गाळ्याला टाळे ठोकले. त्यानंतर त्यातील साहित्य काढून पंचनामा केला व ते महापालिकेकडे जमा केले होते. गाळाधारकाने त्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी न्यायालयाने सर्व साहित्य त्या मालकाला द्यावे, असा आदेश दिला होता. त्यानुसार बुधवारी जवळपास 7 ते 8 लाख रुपयांचे साहित्य संबंधित मालकाला परत केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.