For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जुन बबुताचे पाठोपाठ विजय

06:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्जुन बबुताचे पाठोपाठ विजय
Advertisement

वृत्तसंस्था /भोपाळ

Advertisement

आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय निवड चाचणी नेमबाजी स्पर्धेत भारताचे अव्वल नेमबाज दर्जेदार कामगिरी करीत आहेत. अर्जुन बबुताने या चाचणी नेमबाजी स्पर्धेत पाठोपाठ विजय नोंदविलेत. भारताची महिला नेमबाज आशी चोक्सीने विश्वविक्रम मोडीत काढला. पुरूषांच्या 10 मी. एअर रायफल टी-4 अंतिम फेरीत अर्जुन बबुताने 252.5 गुण नोंदवित विजेतेपद मिळविले. अर्जुनने मंगळवारी तिसऱ्या निवड चाचणीमध्येही पहिले स्थान मिळविले होते. तामिळनाडूचा श्री कार्तिक शबरीराजने दुसरे स्थान तर राजस्थानच्या यशवर्धनने तिसरे स्थान मिळविले. महिलांच्या 25 मी. एअर पिस्तुल चौथ्या निवड चाचणीमध्ये भारताची माजी आशियाई स्पर्धेतील चॅम्पियन राही सरनोबतने 583 गुणासह पहिले स्थान मिळविले. पंजाबची जसप्रीत कौर दुसऱ्या तर अनुराज सिंगने तिसरे स्थान घेतले. भोपाळच्या आशी चोक्सीने महिलांच्या 50 मी. रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारातील चौथ्या टप्प्यात नवा विश्वविक्रम करताना 597 गुण नोंदविले.

Advertisement
Advertisement
Tags :

.