For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Bachchu Kadu | जे सरकारला जमलं नाही, ते मुंढेंनी करून दाखवलं!" बच्चू कडूंकडून आयएएस तुकाराम मुंढेंचे भर सभागृहात जाहीर कौतुक

06:03 PM Jun 23, 2026 IST | NEETA POTDAR
bachchu kadu   जे सरकारला जमलं नाही  ते मुंढेंनी करून दाखवलं   बच्चू कडूंकडून आयएएस तुकाराम मुंढेंचे भर सभागृहात  जाहीर कौतुक
Advertisement

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे हे अॅक्शन मोडवर पहायला मिळत आहे.. त्यांनी अन्न व औषधची भेसळ थांबण्यासाठी राज्यात गेल्या बऱ्याच दिवसांपासुन कारवाईचा धडकाच लावला आहे...शेगावची कचोरी असो किंवा पुण्यातील औषधांची दुकाणे असो तुकाराम मुंढें यांनी कारवाई करत या सगळ्याचे चाचणी करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी अॅक्शन देखील घेत... याचे नमुने चाचणी पाठवली आहे... तुकाराम मुढें यांच्या या अॅक्शनमुळे वागावात पानटपरी, लहान सहान दुकानातील मालकांचे धाबे दणाणले आहे.... तुकाराम मुंढेंच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत असतानाच,आता तुकाराम मुढें यांच्या कामाचे आज विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आमदार बच्चू कडू यांनी कौतुक केले आहे...

Advertisement

काय म्हणाले बच्चू कडू?

विधानपरिषदेत 260 च्या कर्जमाफीच्या प्रस्तावावर बोलताना आमदार बच्चू कडू यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंचं कौतुक केलं. राज्यातील अधिकारी, सरकार जे करू शकले नाही, ते अधिकारी करू शकतात याच उत्तम उदाहरण तुकाराम मुंढे आहेत. मुंढेंमुळे चुकीच्या गोष्टी बंद झाल्या, माझ्या भागात गुटखा-मावा मिळत नाही, असा अनुभव बच्चू कडूंनी सांगितलं. तसेच बाकी अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष द्यायला हवं, असा सल्लाही बच्चू कडूंनी दिला. बच्चू कडूंनी मंत्री शंभूराजेंना उद्देशून म्हटले, एक सांगतो दुधातील भेसळ थांबली तर हमी भाव मागावा लागणार नाही. मी तुकाराम मुंढेंना सांगतो की त्यांनी दुधाची भेसळ थांबवावी... असं ते म्हणाले...

Advertisement

Advertisement
Tags :

.