For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीएसी, हुबळी अकादमी, जिमखाना, बीडीके संघ विजयी

10:05 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
बीएसी  हुबळी अकादमी  जिमखाना  बीडीके संघ विजयी
Advertisement

केएससीए 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक 19 वर्षांखालील अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून बेळगाव स्पोर्ट्स क्लबने सिग्नेचर स्पोर्ट्स क्लबचा, हुबळी क्रिकेट अकादमीने श्री सिद्धारुढ स्वामी संघाचा,युनियन जिमखानाने बीडीके स्पोर्ट्स क्लब सी चा तर बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन संघाने भटकळ स्पोर्ट्स क्लबचा पराभव करून प्रत्येकी चार गुण मिळविले. या स्पर्धेत सिद्धेश असलकर, आशुतोष हिरेमठ यांची दमदार शतके, केदारनाथ तोडकर, विनायक बाचीकर यांनी प्रत्येकी सहा बळी घेतले. ऑटोनगर बेळगाव येथील केएससीए क्रिकेट मैदानावर पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 2 गडी बाद 389 धावा जमविल्या. त्यामध्ये आशुतोष हिरेमठने 2 षटकार व 20 चौकारांसह 136 चेंडूत 160 तर सिद्धेश असलकरने 1 षटकार, 11 चौकारांसह 107 धावा करून दमदार शतके झळकविली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 210 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. त्यांना आर्यन कुंदपने 6 चौकारांसह नाबाद 67 तर कावेश मुक्कनवरने 2 चौकारांसह नाबाद 26 धावा केल्या. सिग्नेचरतर्फे दर्शन सुनगारने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव 23.5 षटकात सर्व गडी बाद 60 धावांत गारद झाला. त्यात गुऊ राघवेंद्र नाईकने 5 चौकारांसह 30 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे केदारनाथ तोडकरने 10 धावात 6 गडी बाद करत निम्म्याहून अधिक संघ गारद केला. त्याला हर्ष पटेलने तीन तर नील पवारने एक गडी बाद करीत सुरेख साथ दिली.

दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 43.5 षटकांत सर्व गडी बाद 232 धावा केल्या. त्यात विनायक बाचीकरने 8 चौकारांसह 56, लक्ष परमारणे 8 चौकारांसह 42, बसवराजने 7 चौकारांसह 36 धावा केल्या. बीडीकेतर्फे महेंद्र हबीबने 26 धावांत 6, प्रीतम, अनिकेत, अक्षय यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन सी संघाचा डाव 37.6 षटकात 116 धावांत आटोपला. त्यात महेंद्र हबीबने 4 चौकारांसह 36 तर प्रीतमने 14 धावा केल्या. जिमखानातर्फे लक्ष परमार, सुमेश बडकर, नागराज यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन अ ने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात सर्वबाद 220 धावा केल्या. अक्षय कुलकर्णीने 11 चौकारांसह 101 धावा करून शतक झळकविले. त्याला गणेश मॅगीनमनीने 4 चौकारांसह 44 धावा करून सुरेख साथ दिली. भटकळतर्फे अहमद अलीने 41 धावात 4, फाऊखने 3 तर राहिलने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना भटकळ संघाचा डाव 30.3 षटकात सर्व गडीबाद 99 धावांत आटोपला. त्यात अतिकने 20, हर्षलने 14 तुफानने 15 तर अहमदने 12 धावा केल्या. बीडीकेतर्फे हर्षाने 23 धावांत 4 तर मुसहिम, वाहिद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कर्नाटक जिमखाना येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हुबळी क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25.4 षटकात सर्व गडीबाद 105 धावा केल्या. त्यात आर्याने 24, शिवतेजने 14, रितेश राजने 17 तर यशोधनने 12 धावा केल्या. श्री सिद्धारुढ स्वामीतर्फे प्रतीक नाईकने 30 धावांत 5 तर मुस्तफा 30 धावात चार गडी बाद केले.प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री सिद्धारूढ स्वामी स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव 17.3 षटकात 64 धावात आटोपला. त्यात प्रीतम नाईकने 18 तर प्रतीकने 15 धावा केल्या. हुबळीतर्फे यशवर्धनने 8 धावांत 4 तर व्यंकटेशने 3 गडी बाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.