1,30,000 वर्षांपूर्वीचा बेबी मॅमथ
दिसली थक्क करणारी गोष्ट
माणसांपूर्वी पृथ्वीवर अनेक प्रजाती नांदत होत्या. डायनासोरपासून मॅमथ यापैकी एक आहे. सायबेरियाच्या पर्माफ्रॉस्टमध्ये 1,30,000 वर्षांपर्यंत संरक्षित एक बेबी मॅमथ मिळाला आहे. वैज्ञानिकांनी आता या बेबी मॅमथचे अध्ययन सुरु पेले आहे. मॅमथ हा हत्तीप्रमाणे दिसणारा जीव होता. या मॅमथचे नाव याना ठेवण्यात आले आहे. सर्वात चांगल्याप्रकारे संरक्षित मॅमथ म्हणून याला मानण्यात आले आहे. रशियाच्या याकुत्स्कमध्ये मॅमथ संग्रहालय असून तेथे यानाच्या अवशेषांची तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान वैज्ञानिकांना त्याच्या अवयवांसंबंधी हैराण करणारी स्थिती दिसून आली. या मॅमथचा आकार 3.9 फूटांचा होता, तर वजन 181 किलोग्रॅम होते. याचे पूर्ण शीर, सेंड आणि हत्तीप्रमाणे दिसणाऱ्या शरीराचा पुढील हिस्सा पूर्णपणे संरक्षित आहे. यात मिल्क टस्क म्हणजे दूधाचे दातही मिळाल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.
बेबी मॅमथचे अनेक अवयव आणि पेशी अत्यंत चांगल्या स्थितीत आहेत. पचनतंत्राचा हिस्सा, पोट आणि आतड्याचे तुकडे खासकरून कोलन शिल्लक आहे. हा आमच्या ग्रहाचा इतिहास आहे. यानाच्या प्रजातीला लुप्त होऊन मोठा कालावधी झालेला नाही. 4 हजार वर्षांपूर्वी ही प्रजाती पृथ्वीवर अस्तित्वात होती, असे सेंट पीटर्सबर्गच्या इन्स्टीट्यूट ऑफ एक्सपेरिमेंटल मेडिसीनचे आर्टेमी गोंचारोव यांनी सांगितले. यानाचा मृत्यू झाला तेव्हा तिचे वय एक वर्ष होते असे वैज्ञानिकांचे मानणे आहे, परंतु तिच्या मृत्यूचे कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही. याच्या मृत्यूमागे मानवाचा हात नव्हता, कारण आधुनिक मानव 28000-32000 वर्षांपूर्वी या भागात पोहोचले होते असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सायबेरियात वितळणाऱ्या पर्माफ्रॉस्टमधून यानाचे शव बाहेर आले होते. याचा मागील हिस्सा अद्याप जमिनीत होता. वैज्ञानिकांनी त्याचे नमुने मिळविले आहेत. मृतदेहावरून सडलेली माती आणि मांसासारखा गंध येत होता. हा मॅमथ 1 लाख 30 हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे स्पष्ट झाले.