For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाबुश मोन्सेरात प्रणित भाजप उमेदवार निश्चित

12:40 PM Feb 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाबुश मोन्सेरात प्रणित भाजप उमेदवार निश्चित
Advertisement

पणजी महापालिका निवडणुकीस चढतोय रंग

Advertisement

पणजी : पणजी महापालिका निवडणुकीत बाबुश मोन्सेरात प्रणित भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निश्चित झाले आहेत. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी आज बुधवारी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे, मात्र यावेळी महापौरपदाचा उमेदवार अन्य असू शकतो, असेही स्पष्ट केले. पणजी महापालिकेवर बाबुश मोन्सेरात यांची गेली 15 वर्षे सत्ता आहे. गेली सहा वर्षे त्यांचा मुलगा रोहित हा महापौरपदी आहे. आता नव्याने निवडणूक लढवताना भाजप त्यामध्ये सहभागी झालेला आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्वत: बाबुश हे या निवडणुकीतलक्ष घालत आहेत.

कोणाचे वैयक्तिक पॅनल नाही

Advertisement

दामू नाईक यांनी सांगितले की पणजी महापालिका निवडणुकीत कोणाचे वैयक्तिक पॅनल नसून ते भारतीय जनता पक्षाचे आहे. बाबुश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविणार असून या निवडणुकीत आम्ही संपूर्ण 30 ही उमेदवार विजयी करून देणार आहोत. पणजीकर जनता भाजपला आजपर्यंत साथ देत आलेली आहे, तशीच ती यावेळी देखील देईल असे दामू नाईक म्हणाले.

अन्य कोणीही महापौर असू शकतो 

पुन्हा रोहित हेच पुढील पाच वर्षे महापौर म्हणून राहणार आहेत का? भाजपकडे दुसरा एकही पात्र उमेदवार नाही का? असे दामू नाईक यांना विचारले असता यावेळी चित्र थोडे बदललेले दिसेल. अन्य उमेदवार देखील महापौर होऊ शकतो, असे दामू नाईक पुढे म्हणाले.

बाबुशच्या पॅनलमध्ये भाजपचे केवळ नऊ उमेदवार?

दरम्यान प्राप्त माहितीनुसार पणजी महापालिकेवर बाबुशचेच पॅनल आहे. त्यात भाजपचे केवळ नऊ उमेदवार आहेत. भाजपने जी यादी तयार केली होती, त्यातील केवळ नऊ उमेदवारांची निवड बाबुशनी आपल्या पॅनलमध्ये केलेली आहे. बाबुश हे प्रमोद सावंत सरकारमध्ये महसूलमंत्री आहेत. त्यामुळे त्यांचे उमेदवार हेच भाजपचे उमेदवार आहे, असे म्हणणे आता भारतीय जनता पक्षाला भाग पडले आहे.

Advertisement
Tags :

.