रोमांच वाढविणार ‘बबीता सिंह रिपोर्टिंग’
अभिनेता वरुण सोबतीचा आगामी चित्रपट ‘बबीता सिंह रिपोर्टिंग’ची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट एका इन्वेस्टिगेटिव्ह ड्रामावर आधारित आहे. चित्रपट एका हत्येचे प्रकरण अन् तपासाशी संबंधित आहे. ‘बबीता सिंह रिपोर्टिंग’मध्ये मुख्य भूमिका बबीता सिंह नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याची असून तिच्याकडे एका हत्येच्या प्रकरणाचा तपास येतो. यादरम्यान तिचा सामना अनेक रहस्यं अन् धोक्यांशी होतो. चित्रपटाची कहाणी पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील समस्या दर्शवितो, या पूर्ण प्रवासात ती स्वत:चा देखील शोध घेते. ‘बबीता सिंह रिपोर्टिंग’ हा चित्रपट 28 ऑगस्टपासून प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंबिका पंडित यांनी केले आहे. तर कथा अमिता व्यास यांनी लिहिली आहे. चित्रपटात पोलीस अधिकारी बबीता सिंह उर्फ बेबी ही भूमिका निमिषा सजयन यांनी साकारली आहे. तर वरुण सोबती आणि अंशुमान पुष्कर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘बबीता सिंह रिपोर्टिंग’ या चित्रपटाची निर्मिती ‘पाताल लोक’ या गाजलेल्या सीरिजच्या निर्मात्यांकडून करण्यात आली आहे.