For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मल्याळी चित्रपटात बाबिल खान

06:11 AM Jun 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
मल्याळी चित्रपटात बाबिल खान
Advertisement

अभिनेता इरफान खानचा पुत्र बाबिल हा मल्याळी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. त्याने स्वत:चा पहिला मल्याळी चित्रपट ‘गांधी बाजार संडे मार्केट’चे चित्रिकरण सुरू केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध फिल्ममेकर बाबू जनार्दन करत आहेत. या चित्रपटात अपर्णा बालमुरली, दीपक परंबोल, निखिल नायर, जॉनी एंटनी, जगदीश, सुधीर करमना, आथमिया राजन आणि जयशंकर हे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement

मी नेहमीच मल्याळी चित्रपट आणि त्याच्या कहाणी मांडण्याच्या शैलीने प्रभावित राहिलो आहे. मल्याळी चित्रपटाने नेहमीच माझ्या मनात अत्यंत खास स्थान निर्माण केले आहे. येथे कहाण्या ज्या प्रामाणिकपणे, संवेदनशीलतेन आणि भावनात्मक खोलीसह मांडल्या जातात, ते वाखाणण्याजोगे आहे. सिलिगुडीत ‘गांधी बाजार संडे मार्केट’चे चित्रिकरण सुरू करणे माझ्यासाठी अत्यंत रोमांचक आणि रचनात्मक असल्याचे बाबिलने म्हटले आहे.

बाबिलने मागील काही वर्षांमध्ये स्वत:च्या अनोख्या आणि भावनात्मक रुपात सशक्त अभिनयाच्या जोरावर स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. तो यापूर्वी ‘लॉगआउट’ या चित्रपटात दिसून आला होता. याचबरोबर कला, फ्रायडे नाइट प्लॅन, द रेल्वे मॅन यासारख्या प्रोजेक्टमधील अभिनयासाठी त्याचे कौतुक झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.