महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पंजाबमध्ये बब्बर खालसा दहशतवाद्याला अटक

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शस्त्रे जप्त, टार्गेट किलिंगचा होता कट : अमेरिका-इटलीतील हँडलर्सच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट

Advertisement

वृत्तसंस्था /अमृतसर

Advertisement

पंजाब पोलिसांच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलने (एसएसओसी) अमृतसरने बब्बर खालसा इंटरनॅशनलचे मॉड्यूल उद्ध्वस्त केले आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे टार्गेट किलिंगची योजना आखणाऱ्या दहशतवाद्याला अटक करतानाच पोलिसांनी आरोपीकडून शस्त्रेही जप्त केली आहेत. या कारवाईमुळे संभाव्य टार्गेट किलिंगच्या अनेक घटनांना आळा बसल्याचे मानले जात आहे. पंजाबमध्ये टार्गेट किलिंगचा कट उघड झाला आहे. पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी यासंबंधी माहिती देताना पोलिसांनी पंजाबमधील अमृतसर येथून बब्बर खालसा इंटरनॅशनल या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी मॉड्यूलच्या एका सदस्याला अटक केल्याचे सांगितले. गुप्तचर माहितीच्या आधारे पंजाब पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

अमेरिकास्थित दहशतवादी हरप्रीत सिंग उर्फ हॅप्पी पासिया याच्या संपर्कात राहून कट-कारस्थान रचणाऱ्या रेशम सिंग याला राज्य स्पेशल ऑपरेशन सेलने अमृतसर येथून अटक केली आहे. रेशम सिंग हा हरप्रीत सिंगचा सहकारी असून तो इटलीमध्ये राहतो. या अटकेमुळे संभाव्य टार्गेट किलिंग टळल्याचे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. पंजाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासाअंती अटक करण्यात आलेला आरोपी त्याच्या परदेशी मालकांच्या सूचनेनुसार बेकायदेशीर कामे करण्यात व्यग्र असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पंजाब पोलीस पुढील तपास आणि कारवाई करत आहेत.

लॉरेन्स-ब्रार टोळीच्या सदस्यांनाही अटक

यापूर्वी बुधवारी पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सने भटिंडा आणि राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार टोळीच्या 3 साथीदारांना संयुक्त कारवाईत अटक केली होती. आरोपींचा गुन्हेगारी इतिहास असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. त्यांना प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्यांना लक्ष्य करण्याचे काम परदेशातून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article