For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाबर आझमकडे पुन्हा कर्णधारपद

06:22 AM Jul 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाबर आझमकडे पुन्हा कर्णधारपद
Advertisement

वृत्तसंस्था, इस्लामाबाद

Advertisement

शान मसुदला कसोटी पदावरुन डच्चू दिल्यानंतर बाबर आझमकडे पुन्हा पाक कसोटी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. आगामी होणाऱ्या विंडीज आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकांसाठी पाकचे नेतृत्व बाबर आझम करणार असल्याची घोषणा रविवारी पीसीबीच्या प्रवक्त्याने केली.

2023 च्या अखेरीस बाबर आझमला तत्कालीन कर्णधारपद सोडावे लागले होते. त्यानंतर शान मसूदची कसोटी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. शान मसूदच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीमध्ये पाक संघाची कामगिरी निकृष्ट झाली. या कालावधीत 16 पैकी 12 सामन्यात पाकला पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पाक निवड समितीने शान मसूदला कर्णधार पदावरुन डच्चू देण्याचा निर्णय घेतला असून बाबर आझमकडे पुन्हा कप्तानपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे निवड समिती सदस्य अकिब जावेदने लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement

मसुदच्या नेतृत्वाखाली पाक संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली होती. त्यानंतर बांगलादेशकडून पाक संघाला त्यांच्या मायभूमीत 2-0 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. मसूदच्या नेतृत्वाखालील पाकने इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका घरच्या भूमीवर 2-1 अशी जिंकली होती. गेल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतक्त्यात पाकला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. बाबर आझमने आपल्या नेतृत्वाखालील यापूर्वी 20 पैकी 10 कसोटी सामने पाकला जिंकून दिले आहेत.

पाक संघ : बाबर आझम (कर्णधार), अमीर जमाल, अब्दुल्ला फझल, मोहम्मद अब्बास, मोहम्मद अली, अली उस्मान, अझान आवेस, इमाम उल हक, खुर्रम शेहजाद, मोहम्मद रिझवान, आवेश जाफर, गाझी घोरी, साजिद खान, सलमान अली आगा, शान मसूद आणि उबेद शहा.

विंडीज संघाबरोबरची मालिका - पहिली कसोटी 25 ते 29 जुलै तेरोबा येथे, दुसरी कसोटी 2 ते 6 ऑगस्ट पोर्ट ऑफ स्पेन.

इंग्लंड बरोबरची मालिका - पहिली कसोटी 19 ते 23 ऑगस्ट लिड्स येथे, दुसरी कसोटी 27 ते 31 ऑगस्ट लॉर्ड्स येथे, तिसरी कसोटी 9 ते 13 सप्टेंबर बर्मिंगहॅम येथे.

Advertisement
Tags :

.