For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाहुबली धनंजय सिंहची बरेली कारागृहातून सुटका

06:22 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
बाहुबली धनंजय सिंहची बरेली कारागृहातून सुटका
Advertisement

उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Advertisement

वृत्तसंस्था/ बरेली

उत्तर प्रदेशातील बाहुबली नेता आणि माजी खासदार धनंजय सिंह तुऊंगाबाहेर आला आहे. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्याची बरेली मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. गेल्या शनिवारी माजी खासदाराला जौनपूरहून बरेली तुऊंगात हलवण्यात आले होते. त्याची शिक्षा कायम असली तरी त्याला जामीन मंजूर झाला आहे. तो तुरुंगातून बाहेर येईल पण निवडणूक लढवू शकणार नाही. धनंजय सिंहची पत्नी श्रीकला रेड्डी यांना बसपकडून जौनपूर लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. त्यामुळे तुरुंगातून सुटका होताच ते समर्थकांच्या ताफ्यासह जौनपूरला रवाना झाले.

Advertisement

माजी खासदार धनंजय सिंह यांच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, जौनपूर जिल्हा न्यायालयात औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सुटकेचा आदेश बरेली तुऊंगात पोहोचला. त्यानंतर बुधवारी सकाळी तो कारागृहाबाहेर आला. त्याच्या सुटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी धनंजयचे वकील, कुटुंबीय आणि समर्थक आधीच बरेलीला पोहोचले होते.

अपहरण प्रकरणात धनंजयला 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिलेली नसल्याने, या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्यायचे की उच्च न्यायालयात याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. धनंजय सिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतरच या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा किंवा उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याबाबत विचार केला जाईल.

Advertisement
Tags :

.