पाक संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी अझहर मेहमूद
वृत्तसंस्था / लाहोर
पाक क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी माजी अष्टपैलु अझहर मेहमूदच्या नियुक्तीची घोषणा पीसीबीने केली आहे. पीसीबी आणि अझहर मेहमूद यांच्यात झालेल्या या करारानुसार मेहमूदकडे हे पद एक वर्षांसाठी राहील.
सध्याच्या पाक कसोटी संघाचे प्रमुख प्रशिक्षकपदी अझहर मेहमूद कार्यरत आहे. गेल्या वर्षी पीसीबी आणि अझहर मेहमूद यांच्यात गेल्या वर्षी दोन वर्षांसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून करार करण्यात आला होता. आता अझहर मेहमूदबरोबर पीसीबीने प्रमुख प्रशिक्षक म्हणून लेखी करार केला असून या कराराची मुदत पुढील वर्षीच्या एप्रिलपर्यंत राहील. यापूर्वीचे प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे जेसन गिलेस्पी आणि द. आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांनी मायदेशी जाण्याचा निर्णय घेतल्याने पीसीबीने वरील निर्णय घेतला. 50 वर्षीय अझहर मेहमूदने 1996 ते 2007 या कालावधीत 21 कसोटी आणि 143 वनडे सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व केले आहे.