न्यूझीलंड संघातून अझाज पटेलला डच्चु
वृत्तसंस्था/वेलिंगटन
न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका न्यूझीलंडमध्ये खेळविली जाणार असून या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. मात्र फिरकी गोलंदाज अझाज पटेलला निवड समितीने डच्चु दिला आहे. या मालिकेसाठी न्यूझीलंड संघाचे नेतृत्व टॉम लेथमकडे सोपविण्यात आले आहे. भारतामध्ये नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडच्या विजयामध्ये अझाज पटेलचा महत्त्वाचा होता. त्याने यामालिकेतील तिसऱ्या कसोटीत 160 धावांत 11 गडी बाद केले होते. पण निवड समितीने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला वगळले आहे. या मालिकेकरिता न्यूझीलंड संघात मिचेल सॅन्टेनर हा एकमेव प्रमुख फिरकी गोलंदाज आहे. गेल्यावर्षी मिचेल सॅन्टेनरचे न्यूझीलंडच्या कसोटी संघात पुररागमन झाले होते. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातल पहिली कसोटी ख्राईस्टचर्च येथे 28 नोव्हेंबरला, दुसरी कसोटी वेलिंग्टनला 6 डिसेंबरपासून तर तिसरी आणि शेवटची कसोटी 14 डिसेंबरपासून हॅमिल्टन येथे होणार आहे.
न्यूझीलंड संघ : टॉम लेथम (कर्णधार), ब्लंडेल, कॉन्वे, डफी, मॅट हेनरी, मिचेल, ओरुरके, फिलीप्स, रचिन रविंद्र, मिचेल सॅन्टेनर, नाथन् स्मिथ, टीम साऊदी, के. एन. विलीयमसन आणि विल यंग