महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आझम खान यांना 10 वर्षांची शिक्षा

07:00 AM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डुंगरपूर प्रकरणात न्यायालयाने 14 लाखांचा दंडही ठोठावला

Advertisement

वृत्तसंस्था /रामपूर

Advertisement

डुंगरपूर प्रकरणात खासदार-आमदार न्यायालयाने गुऊवारी आझम खान यांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली. याशिवाय न्यायालयाने 14 लाखांचा दंडही ठोठावला आहे. यापूर्वीच वेगवेगळ्या गुन्ह्यात दोषी ठरल्याने शिक्षा भोगत असलेल्या आझम खान यांना न्यायालयाने बुधवारी आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले होते. आता या नव्या प्रकरणात त्यांच्यावर डुंगरपूर वसाहत बळजबरीने रिकामी करणे, प्राणघातक हल्ला, तोडफोड, लूटमार आणि धमकावणे असे आरोप आहेत. हे प्रकरण 6 डिसेंबर 2016 रोजी घडलेले आहे. याप्रकरणी आझम खान यांच्याविरोधात 2019 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामपूरच्या खासदार-आमदार सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. माजी पॅबिनेट मंत्री आझम खान यांना दोषी ठरवल्यानंतर बुधवारी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर गुरुवारी न्यायाधीश डॉ. विजय कुमार यांनी त्यांना दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आझम खान सध्या सीतापूर कारागृहात आहेत. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कारागृहात हजर करण्यात आले होते.  समाजवादी पक्षाच्या नेतृत्त्वातील सरकारच्या काळात डुंगरपूरमध्ये आसरा घरे बांधण्यात आली होती. या ठिकाणी काही लोकांची घरे आधीच बांधलेली होती. ती सरकारी जमिनीवर असल्याचे कारण देत 2016 मध्ये पाडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. लुटमारीचा आरोपही पीडितांनी केला होता. 2019 मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच याप्रकरणी रामपूरच्या गंज पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article