आझाद इंजिनियरिंगचा आयपीओ 20 डिसेंबरला बाजारात
वृत्तसंस्था/ मुंबई
आझाद इंजिनियरिंग यांचा आयपीओ 20 डिसेंबर रोजी शेअर बाजारामध्ये सबक्रीप्शनसाठी खुला होणार आहे. सदरच्या आयपीओअंतर्गत समभागाची किंमत 499-524 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे.
सदरचा आयपीओ 22 डिसेंबर रोजी बंद होणार असून तोपर्यंतच गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. एका लॉट अंतर्गत 28 समभागांची खरेदी गुंतवणूकदारांना करता येणार आहे. आयपीओ अंतर्गत 50 टक्के समभाग संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के व बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 15 टक्के समभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.
किती रक्कम उभारणार
आयपीओच्या माध्यमातून कंपनी 740 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. या अंतर्गत 240 कोटी रुपयांचे ताजे समभाग कंपनी सादर करेल असे म्हटले जात आहे. प्रवर्तक आणि इतर समभागधारकांतर्फे 500 कोटी रुपयांपर्यंतचे समभाग ऑफर फॉर सेल अंतर्गत सादर केले जातील.