महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आयुष्मति गीता मॅट्रिक पास’ लवकरच झळकणार

06:11 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रदीप खैरवार यांचा कौटुंबिक ड्रामा ‘आयुष्मति गीता मॅट्रिक पास’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये गीताच्या संघर्षाची कहाणी दिसून येते. आगामी चित्रपट शिक्षण, सशक्तीकरण आणि सामाजिक बदलावर आधारित एका मनस्पर्शी कहाणी मांडणारा आहे.

Advertisement

या ट्रेलरमध्ये गीता नावाच्या युवतीच्या प्रेरक प्रवासाची झलक दिसून येते. गीता ही युवती सामाजिक अडथळ्यांना दूर सारून शिक्षण प्राप्त करण्यासाठी दृढनिश्चयी असल्याचे दाखविण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये गीता आणि कुंदन यांच्यातील मार्मिक बंधनही दर्शविण्यात आले आहे.

Advertisement

हा चित्रपट 18 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. आयुष्मति गीता मॅट्रिक पास या चित्रपटात महिलांकडून दाखविण्यात आलेली शक्ती आणि लवचिकता दाखविण्यात आली आहे. चित्रपट जीवन आणि नात्यांना बदलणाऱ्या शिक्षणाच्या शक्तीवर जोर देणारा आहे  असा दावा दिग्दर्शक प्रदीप खैरवार यांनी केला आहे. यात कशिका कपूरने नायिकेची भूमिका साकारली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article