महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आयुष्मान अन् रश्मिका येणार एकत्र

06:24 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिनेश विजानच्या चित्रपटासाठी निवड

Advertisement

मुंज्या या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आदित्य सरपोतदार आणि दिनेश विजान आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट निर्माण करणार आहेत. या चित्रपटाचे नाव ‘वॅम्पायर्स ऑफ विजय नगर’ असणार आहे. चित्रपटात आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना ही जोडी दिसून येणार असल्याचे समजते. हा चित्रपट देखील दिनेश विजानच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा हिस्सा असणार आहे.

Advertisement

विजान यांनी 2018 मध्ये ‘स्त्राr’द्वारे याची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी भेडिया आणि मुंज्या या चित्रपटांची निर्मिती केली होती. दिनेश विजानने आता नव्या चित्रपटासाठी आयुष्मान आणि रश्मिका यांची निवड केली आहे. चित्रपटाची कहाणी वॅम्पायर्सवर आधारित असेल. आयुष्मान आणि दिनेश विजान यांनी यापूवीं ‘बाला’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. तर नव्या चित्रपटाचे चित्रिकरण चालू वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू होणार आहे.

सध्या या चित्रपटाच्या कथेवर काम केले जात आहे. लवकरच याचे निर्मितीपूर्व काम सुरू होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुष्मान आणि रश्मिका मंदाना ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. वॅम्पायर्स ऑफ विजय नगर चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करण्यापूर्व आयुष्मान हा करण जौहरचा नवा चित्रपट तसेच अनुराग सिंह यांच्या चित्रपटाचे शूटिंग संपविणार आहे. तर रश्मिका लवकरच अल्लु अर्जुनसोबत पुष्पा 2 चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article