प्रसिद्ध आयुर्वेदिक वैदू जुगू यमकर यांचे निधन
वार्ताहर/ आंबोली
आंबोली पंचक्रोशीतील तथा महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटक राज्यात आयुर्वेदीक औषधांचा बादशहा म्हणून सुपरिचित असणारे जुगू सिधू यमकर( जुगू मामा )यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते गेले महिनाभर आजारी होते. त्यांनी आयुर्वेदीक औषधांच्या जोरावर अनेकांचे ऊद्धस्त होणारे संसार बसविले, अनेकांचे प्राणही वाचाविले. त्यांच्या जाण्याने आयुर्वेदाची मोठी हानी झाली आहे. कॅन्सरवर ज्यांनी औषधाचा शोध लावला ते संशोधक प्रथम या जुगू मामांना भेटून त्यांनी त्या औषधासंबंधी माहिती घेऊन त्यावर संशोधन केले.जुगू मामा यांच्याकडे एक नैसर्गिक देणगी होती. ते कोणालाही कुठल्याही आजारावर औषध हवे असल्यास आपल्या देवीला प्रथम कौल लावत असत. देवीने जर कौल उजवा दिला तरच ते देवीच्या शब्दानुसार त्या रोग्याला ते औषध देत असत देवी कडून डावा कौल आल्यास ते अजून इतर ठिकाणी कौल लावून चौकशी करा आणि मग या असे सांगत.त्यांच्याकडे गोवा,कर्नाटक राज्यातून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून औषधोपचारासाठी येत असत. कॅन्सर, वंध्यत्व , संधीवात, पोटातील आजार , मुतखडा, भगेंद्र, काविळ, आदी सर्व रोगांवर आयुर्वेदीक झाड पाल्याची औषधे होती. त्यांच्या निधनाने आंबोली पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे .