For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध रोगांवर आयुर्वेद औषधे प्रभावी, गुणकारी : सर्वेश जल्मी

11:45 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
विविध रोगांवर आयुर्वेद औषधे प्रभावी  गुणकारी   सर्वेश जल्मी
Advertisement

कुंडई गणेश मंडळ, सार्थक फाऊंडेशनतर्फे आरोग्य शिबिर

Advertisement

पणजी : उत्तम आरोग्य हा जीवनाचा मार्ग आहे; त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेद हा इतर औषधी पद्धतींचा एक पर्याय आहे, आयुर्वेदिक औषधे विविध रोगांवर प्रभावीपणे काम करत आहेत, असे कुंडईचे सरपंच सर्वेश जल्मी यांनी कुंडई येथे सांगितले. मानसवाडा, कुंडई येथील सार्वजनीक गणेशोत्सव सभागृहात आरोग्य निकेतन, आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्रातर्फे सार्थक फाऊंडेशन गोवा आणि सार्वजनीक गणेशोत्सव समिती कुंडई-गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर तसेच मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आणि मोफत बोन डेन्सिटी आणि मधुमेह तपासणी शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर जल्मी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्राचे प्रमुख डॉ. समीर जोशी, डॉ. पाटील, डॉ. दिपाली नाईक, पंचसदस्य विश्वास फडते, लेन्स आणि स्पेक्ट ऑपटीकलच्या प्रमुख सौ. सपना राणी, सार्थक फाऊंंडेशन गोवाचे सदस्य रामू नाईक तसेच सार्वजनिक गणेशोत्सव समिती कुंडईचे अध्यक्ष नागेश फडते उपस्थित होते.

आयुर्वेदिक औषधांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, त्यामुळे आयुर्वेदिक औषधे आरोग्यासाठी पोषक असतात, असेही जल्मी म्हणाले. यावेळी डॉ. दीपाली नाईक म्हणाल्या भारताला आयुर्वेदाचा वारसा आहे, कारण ग्रामीण भागातील बहुतेक वृद्ध लोक औषधी वनस्पती आणि औषधी वनस्पतींचे औषध म्हणून सेवन करतात. अलीकडे अनेक लोक आयुर्वेदात संशोधन करण्याच्या कामात गुंतले आहेत. भविष्यात लोकांना याचा फायदा होईल असे पुढे  सांगितले. डॉ. नाईक यांनी आयुर्वेदिक औषधांचा दैनंदिन जीवनात वापर करण्याचे आवाहनही यावेळी केले. भारतात अनेक वर्षांपासून आयुर्वेदाची समृद्ध परंपरा आणि वारसा आहे. त्या काळात मुनी आणि ऋषींनी वनौषधी आणि विविध वनस्पतींमधून अनेक औषधे शोधून काढली आहेत जी विविध रोगांवर गुणकारी आहेत, असे आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म केंद्राचे प्रमुख डॉ. समीर जोशी यांनी सांगितले. यावेळी लेन्स आणि स्पेक्ट ऑप्टिकलच्या प्रमुख सपना राणी, सार्थक फाऊंंडेशन गोवाचे प्रमुख सुदेश नार्वेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंडळाचे अध्यक्ष नागेश फडते यांनी स्वागत केले. कार्यक्रम प्रमुख शांतो गणेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप नाईक यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.