कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आयुर्वेद ही चिकित्सा नाही , तर जीवन जगण्याची शैली

03:13 PM Feb 11, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

उपचिकित्सा अधिक्षक डॉ विनायक चकोर यांचे प्रतिपादन ; मालवणात मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर संपन्न

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानमध्ये आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर घडविणे तसेच रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊ नये यासाठी काम केले जाते. आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. आयुर्वेद संस्थानची सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करण्यासाठी अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत असून आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन गोवा धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे उप चिकित्सा अधिक्षक डॉ विनायक चकोर यांनी केले.गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान आणि मालवण येथील बॅ नाथ पै सेवांगण यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने एस एम जोशी संकुल सेवांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी डॉ विनायक चकोर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे, डॉ दत्तप्रसाद पवार, डॉ अभिषेक तिवारी, डॉ सुमित गोयल, डॉ अंकीता मसुरकर, बॅ नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अँड देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष किशोर शिरोडकर, कार्यवाह लक्ष्मण खोबरेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, संजय आचरेकर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे परिचारक देबाशिष महतो, रसिका तुळसकर, विद्यार्थी तेजस्वी तुळसकर, वैष्णवी शेंमबांदे सुप्रिया मिश्रा, आनंद कुमार आदित्य सेनी, कर्मचारी साईश किनळेकर, गिरीश नाईक, विनीत गवस, रमाकांत भाईप आदी उपस्थित होते.यावेळी बॅ नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मण खोबरेकर यांनी या शिबिरासाठी सहकार्य केल्याबद्दल अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे आभार मानले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मालवण शहर परिसरातील सुमारे ३५८ आबालवृद्धांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरा बाबत सर्व रुग्णांनी समाधान व्यक्त केले. या शिबिराचे बॅ नाथ पै सेवांगणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. या शिबिरात डॉ प्रशांत ससाणे, डॉ विनायक चकोर, डॉ दत्तप्रसाद पवार, डॉ अभिषेक तिवारी, डॉ सुमित गोयल, डॉ अंकीता मसुरकर यांनी हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी केली.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # marathi news# sindhudurg news
Next Article