For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोटरी क्लबतर्फे आज-उद्या मालिनी सिटी येथे ‘अयोध्या’ नाट्याप्रयोग

11:18 AM Mar 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोटरी क्लबतर्फे आज उद्या मालिनी सिटी येथे ‘अयोध्या’ नाट्याप्रयोग
Advertisement

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ संचालित व रोटरी क्लब ऑफ साऊथ फाऊंडेशन यांच्यातर्फे शनिवार दि. 9 व रविवार दि. 10 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता येडियुराप्पा मार्गावरील मालिनी सिटी येथे ‘अयोध्या’ या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. याचे लेखन आणि दिग्दर्शन केदार देसाई यांनी केले असून. निर्मिती प्रणय तेली यांची आहे. रामजन्मभूमीचा संघर्षमय इतिहास आणि प्रेरणादायी शौर्यगाथा यामध्ये पहायला मिळणार आहे. या प्रयोगातून संकलित होणारा निधी व देणगी यांचा विनियोग बेळगावमध्ये सुसज्ज रक्तपेढी निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. या प्रयोगाला बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, ओरिऑनिस प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स, चितळे डेअरी, क्रिश बिल्डर्स, पुरुषोत्तम नारायण गाडगीळ यांचे प्रायोजकत्व व सहकार्य लाभले आहे. देणगी प्रवेशिका कार्यक्रम स्थळावर प्रयोगाच्या दिवशी सकाळी 10 पासून उपलब्ध आहेत. संस्थेला 80जी व 12ए चे प्रमाणपत्र आहे. या अंतर्गत देणगी स्वीकारली जाईल. पार्किंगची सोय विनामूल्य असून बेळगावकरांनी या प्रयोगाचा लाभ घ्यावा व रक्तपेढी उभारण्यासाठी सहकार्य द्यावे, असे आवाहन केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.