For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आग्रापेक्षा अयोध्याच भारी

06:44 AM Dec 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
आग्रापेक्षा अयोध्याच भारी
Advertisement

कॅलेंडर वर्षामध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत उत्तर प्रदेश राज्याने पर्यटकांच्या संख्येच्या बाबतीमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत उत्तर प्रदेशात 476.1 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे अयोध्या हे शहर पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता. आग्य्रातील ताजमहलपेक्षा अयोध्येला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असल्याची बाब स्पष्ट दिसून आली आहे.

Advertisement

यापूर्वी आग्रा येथील ताजमहल पाहणाऱ्या पर्यटकांची संख्या नेहमीच अग्रेसर राहिलेली होती. अयोध्येमध्ये 135.5दशलक्ष देशातील पर्यटक आणि 3153 विदेशी पर्यटकांनी वरील अवधीमध्ये भेट दिली आहे. जानेवारीमध्ये उदघाटन झालेल्या हिंदू धर्मियांच्या राममंदिरामुळे अयोध्येत येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य प्रमाणात कोट्यावधींच्या लाडक्या रामलल्लाच्या मंदिराचे उदघाटन करण्यात आले होते. 22 जानेवारीला हा कार्यक्रम विविध दूरचित्रवाहिन्यांवर लाइव्ह प्रसारीत करण्यात आला होता.

कॅलेंडर वर्ष 2024 च्या पहिल्या 6 महिन्यामध्ये 11 कोटी पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली होती. या अवधीमध्ये उत्तर प्रदेशला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या 33 कोटी इतकी होती. यातील अयोध्येला वरील प्रमाणे 11 कोटी पर्यटक भेट देऊ शकले आहेत. याबाबतीमध्ये पाहता अयोध्येने वाराणसी शहराला पर्यटनाच्याबाबतीत मागे टाकले आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. 7 महिन्यामध्ये पाहता अयोध्येला येणाऱ्या पर्यटकांची संख्या 12 कोटींवर पोहोचली आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे मोठे उत्साहात उद्घाटन झाले होते. या उद्घाटनानंतर या मंदिराची लोकप्रियता देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढली होती. देशासह आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी अयोध्येतील राममंदिर आकर्षणाचा विषय ठरला. मंदिराचे उदघाटन झाल्यानंतर पर्यटकांचा ओघ अपसूकच राम लल्लांच्या दर्शनासाठी वाढलेला दिसला.

Advertisement

आजवर आग्रा येथील ताजमहल पाहणाऱ्या पर्यटकांची संख्dया सर्वाधिक राहिलेली होती. पण आता पर्यटकांचा कल अयोध्येकडे अधिक दिसतो आहे. आग्राचा विचार करता सप्टेंबरपर्यंत 125.1 दशलक्ष पर्यटक या ठिकाणी आले होते. यामध्ये 115.9 दशलक्ष देशातले आणि 9 लाख 24 हजार आंतरराष्ट्रीय पर्यटक होते. मागच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये 480 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली होती. हा महत्त्वाचा टप्पा यावर्षी पहिल्या 9 महिन्यात साध्य करण्यात आला आहे.  धार्मिक पर्यटनाच्या बाबतीमध्ये अयोध्या आता आघाडी घेण्यासाठी पुढे येत आहे. वाराणसीत 62 दशलक्ष देशी पर्यटक आणि 1 लाख 84 हजार विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. कृष्णाची जन्मभूमी असणाऱ्या मथुरेला 68 दशलक्ष देशी आणि 87 हजार 229 विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. प्रयाग राजला 48 दशलक्ष आणि मिर्झापूरला 11.8 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिली आहे. असे जरी असले तरी आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आजही ताजमहलच आकर्षणाचे केंद्र राहिलेले आहे. आग्य्राला 2023-24 वर्षात 27.70 दशलक्ष विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. दुसरीकडे देशातील पर्यटक मात्र धार्मिक पर्यटनांचा विचार करताना विशेषत: हिंदूधर्मिय अयोध्येतील राममंदिराची निवड प्राधान्याने करत असल्याचे पहायला मिळत आहे. अयोध्येतील राम लल्लांचे दर्शन घेण्यासोबतच आजुबाजूच्या धार्मिक पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे नियोजन केले जात आहे. यासोबतच पर्यटक बुद्धाचे स्थान असणाऱ्या कुशीनगरला मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत. या क्षेत्राला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढते आहे. 1.62 दशलक्ष पर्यटकांनी सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत या ठिकाणी भेट दिली आहे. यात 1 लाख 53 हजार आंतरराष्ट्रीय पर्यटक आहेत. अयोध्येला भेट देणारे वाराणसी, मथुरा आणि प्रयागराज या ठिकाणी आवर्जून भेटी देत आहेत. ही ठिकाणे धार्मिक पर्यटनासाठी लोकप्रिय ठरत आहे. विदेशातील पर्यटकांचा विचार करता अमेरिका आणि कॅनडातील पर्यटक उत्तर प्रदेशमधील पर्यटन स्थळांना भेट देणे पसंत करत आहेत. यातही अयोध्येतील राम मंदिराचा नंबर वरचा आहे. यासाठी विमान सेवा, रेल्वे सेवा यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जात आहे.

Advertisement
Tags :

.