Kolhapur : अयोध्या फौंडेशन तर्फे सीमेवरील सैनिकांना दिवाळी फराळाची भेट !
अयोध्या फौंडेशनचा ‘सैनिक दिवाळी फराळ उपक्रम’ उत्साहात पार
शिंगणापूर : प्रतिकूल परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सीमेवरील जवानांना दरवर्षी अयोध्या फौंडेशन व परिवाराच्या माध्यमातून दिवाळी सणानिमित्त फराळ व मिठाईची भेट पाठवण्यात येते आली यावर्षी महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कर्नल विक्रम नलावडे व कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशनचा ‘ सैनिक दिवाळी फराळ उपक्रम’ मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे कर्नल नलावडे म्हणाले की, अयोध्या फौंडेशनच्या माध्यमातून कॅप्टन उत्तम पाटील यांचे भारतीय सैन्याशी अतूट नाते तयार झाले आहेत.सलग १८ वर्षे सातत्याने सुरू असलेला त्यांचा हा प्रवास प्रशंसनीय असून सैनिकांप्रती सामाजिक कृतज्ञता व बांधिलकीची भावना खऱ्या अर्थाने जोपासली असल्याचे म्हटले.
यावेळी १४ आसाम रायफल्सचे रायफल मॅन मारुती खोत,०७ गढवाल रायफल्सचे हवालदार कमलेश्वर प्रसाद,गढवाल स्कॉटचे हवलदार संजयसिंह रावत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अयोध्या फौंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन उत्तम पाटील, १७ मराठा लाईट इन्फंट्रीचे मेजर किरण जाधव,प्राध्यापक अरुण मराठे,किरण साळुंखे,मोहन लोहार,डॉ.इंद्रनील मोहिते, शिवलोचन कारंडे, दिलीप पाटील, यांच्यासह युनिव्हर्सल परिवाराचे सर्व सदस्य मित्र व सहकारी प्रमुख उपस्थितीत होते.