For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
अयोध्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी यांचे नाव
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

अयोध्येतील नव्या विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे नाव दिले जाणार आहे. यापूर्वी अयोध्येतील रेल्वेस्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी अयोध्येच्या दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान विमानतळ आणि रेल्वेस्थानकाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1450 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीतून विकसित करण्यात आला आहे. विमानतळाच्या टर्मिनल भवनाचे क्षेत्रफळ 6500 चौरस मीटर असणार आहे. वर्षाकाठी सुमारे 10 लाख प्रवाशांना सेवा पुरविण्यासाठी हे विमानतळ सज्ज असणार आहे. टर्मिनल भवनची निर्मिती श्रीराम मंदिराची वास्तुकला दर्शविणारी आहे. अयोध्या विमानतळाचे टर्मिनल भवन विविध सुविधांनी युक्त असून यात इंसुलेटेड रुफिंग सिस्टीम, एलईडी  लायटिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग, जलप्रक्रिया प्रकल्प, सौरऊर्जा संयंत्र सामील आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.