For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अयोध्या विमानतळ नावात बदल शक्य

06:27 AM Dec 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
अयोध्या विमानतळ नावात बदल शक्य
Advertisement

उत्तर प्रदेश सरकारकडून केंद्राला प्रस्ताव

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अयोध्येतील जन्मभूमी मंदिरातील भगवान श्रीरामाच्या मूर्तीच्या अभिषेकाची तारीख समीप येत असतानाच अयोध्येचा विकासही जोरात सुरू आहे. विमानतळापासून रेल्वेस्थानकापर्यंत बऱ्याच स्थळांना नवा साज चढला आहे. येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आणि रेल्वेस्थानकावरील नव्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यापूर्वी अयोध्येतील नव्या विमानतळाचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Advertisement

अयोध्येतील नवे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. मर्यादा पुऊषोत्तम श्री राम विमानतळ असे त्याचे नाव आहे. मात्र, हे नाव बदलू शकते. विमानतळाला महषी वाल्मिकी यांचे नाव दिल्याने त्यांना आदर मिळण्याची शक्मयता आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वातील सरकार यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करणार असल्याचे समजते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबर रोजी श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळासह अयोध्या धाम रेल्वेस्थानकाचे औपचारिक उद्घाटन करतील. याचवेळी वंदे भारत आणि अमृत भारत एक्सप्रेसलाही ते हिरवा झेंडा दाखवतील. अयोध्येतील मर्यादा पुऊषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळ 6 जानेवारीपासून प्रमुख भारतीय शहरांना उ•ाणे पुरवण्यास सुऊवात करेल. अयोध्येहून दिल्ली आणि अहमदाबादसाठी पहिली उ•ाणे सुरू होणार आहेत. दिल्लीला जाण्यासाठी आठवड्यातून सात उ•ाणे असतील, तर अहमदाबादला जाण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल, अशी माहिती देण्यात आली. त्याचबरोबर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली पहिली अमृत भारत ट्रेन रामनगरी अयोध्येतून धावणार आहे. हे एक्स्प्रेस ताशी 130 किलोमीटर वेगाने धावताना दिसणार आहे. या एक्स्प्रेसमध्ये 22 बोगी असून त्यामध्ये सर्वसामान्य प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे.

Advertisement
Tags :

.