For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

आयशा खानला मिळाला चित्रपट

06:24 AM Mar 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आयशा खानला मिळाला चित्रपट

बिग बॉस 17 फेम अभिनेत्री

Advertisement

रियलिटी शो ‘बिग बॉस 17’मध्ये मुनव्वर फारुकीवर आरोप केलेली अभिनेत्री आयशा खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. आयशा लवकरच मल्याळी स्टार दुलकर सलमानसोबत चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लकी बस्खर’ असून यात सलमान मुख्य भूमिकेत आहे. हा तेलगू चित्रपट असून आयशा यावरून अत्यंत उत्साही आहे. मला दक्षिणेतील लोकांकडून मिळालेले प्रेम जबरदस्त आहे. मी नेहमीच स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते. दुलकर सलमानकडून मला याप्रकरणी प्रेरणा मिळू शकते असे आयशाने म्हटले आहे.

या चित्रपटात माझी विशेष भूमिका आहे. वेंकी यांच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची आणि उत्तम टीमचा हिस्सा होण्याची संधी मिळणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे तिने म्हटले आहे.

Advertisement

आयशा ही बिग बॉस 17 दरम्यान चर्चेत राहिली होती. मुनव्वरने तिला नॉमिनेट केले होते, यानंतर अभिनेत्रीने मुनव्वरवर अनेक गंभीर आरोप केले होते. मुनव्वरने स्वत:च्या पूर्वाश्रमीचा पत्नीला फसविले होते. मुनव्वर एकाचवेळी अनेक युवतींसोबत रिलेशनशिपमध्ये होता.  शोमध्ये येण्यापूर्वी मुनव्वरने एका युवतीला विवाहाचे आश्वासन दिले होते असा दावा आयशाने केला होता.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.