आयशा लेखिकेच्या भूमिकेत
अभिनेत्री आयशा शर्मा आता लेखिका झाली आहे. चित्रपटांपेक्षा सोशल मीडियावर स्वत:च्या बोल्डनेसवरून चर्चेत राहणाऱ्या आयशाने जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात केली. तिने ब्लूमसोबत लेखिकेच्या स्वरुपात नवी सुरुवात केली. हे पुस्तक दैनंदिन भावनिक अनुभवांनी प्रेरित असल्याचे आयशाचे सांगणे आहे. तणाव, स्वत:बद्दल संशय आणि प्रत्येक गोष्ट सांभाळण्याच्या अथक दबावाला तोंड देणाऱ्या वाचकांशी संवाद साधणारे हे पुस्तक आहे. योग्य पुस्तक योग्यवेळी मिळते, असा माझा दृढ विश्वास आहे. माझ्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, असा मी दावा करत नाही. परंतु माझे पुस्तक व्यक्त करू न शकलेल्या भावनांची जाणीव करून देणारे असल्याचे तिने म्हटले आहे. तिचे हे पुस्तक ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर देखील उपलब्ध झाले.
प्रकाशकांशी संपर्क
हे पुस्तक माझी आत्मकथा नाही, तरीही हे माझ्या वास्तविक भावनात्मक अनुभवांवर आधारित आहे. पुस्तकाची संकल्पना मीच तयार केली तसेच प्रकाशकांशी मी आपणहून संपर्क साधला होता. त्यांच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे मी प्रोत्साहित झाले. स्वत:च्या शैलीनुसार माझे लिखाण पुढे जात राहिले. अनेक गोष्टी तर खासगी डायरी लेखन आणि आत्मचिंतनाच्या रुपात सुरू झाल्या. मग त्यात हळूहळू दाट भावना येऊ लागल्याचे ती सांगते.
आईवडिलांना श्रेय
माझे आईवडिलच या पुस्तकाच्या अस्तित्वाचे कारण आहेत. त्यांनी नेहमीच मनाचे ऐकणे आणि स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले. याच विश्वासाने गांभीर्याने लिहिण्याचे साहस दिल्याचे आयशाने सांगितले.