महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किल्ला परिसरात विनापरवाना वृक्षांवर कुऱ्हाड

11:07 AM Sep 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यावरणप्रेमी संतप्त : वनखात्याचे दुर्लक्ष : कारवाई करण्याची मागणी

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंट अखत्यारितील किल्ला परिसरातील विनापरवाना झाडांची कत्तल करून तस्करी होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याबाबत वनखाते मात्र दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमीतून होत आहेत. शहरातील ऐतिहासिक दुर्गादेवी मंदिर असलेल्या किल्ला परिसरात बेकायदा झाडे तोडली जात आहेत. या प्रकारामुळे संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त होऊ लागल्या आहेत. मागील दोन दिवसापासून कॅन्टोन्मेंट किल्ला परिसरात बेकायदा झाडांची कत्तल केली जात असल्याच्या तक्रारी वनखात्याकडे करून देखील खात्याचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. झाडांच्या फांद्या तोडण्याची परवानगी घेऊन संपूर्ण झाड तोडण्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. त्याबरोबर बेकायदा झाडे तोडून विक्री होत असल्याचाही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे किल्ला परिसरातील वृक्ष संपत्तीला धोका निर्माण झाला आहे.

Advertisement

फांद्या तोडण्याची परवानगी घेऊन संपूर्ण झाडच तोडण्याचे प्रकार उघड 

किल्ला परिसरात विविध प्रकारची झाडे मोठी झाली आहेत. मात्र या झाडावरच आता बेकायदा कुऱ्हाडीचे घाव घातले जात आहेत. विद्युत खांब आणि इतर ठिकाणी अडचण ठरत असलेली झाडे न तोडता केवळ फांद्या तोडाव्यात, असे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात संपूर्ण झाडावरच घाव घालण्याचे प्रकारही घडले आहेत. विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि वृक्षतोड झालेल्या ठिकाणी वृक्षारोपण करावे, अशी मागणीही पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

वृक्षतोडीसाठी वनखात्याची परवानगी आवश्यक 

किल्ला परिसरात बेकायदेशीरपणे झाडे तोडून वाहतूक केल्याप्रकरणाची माहिती संकलित केली जात आहे. याची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे. वृक्षतोडीसाठी वनखात्याची परवानगी आवश्यक आहे.

- पुरुषोत्तम रावजी (आरएफओ)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article