चोऱ्या, घरफोड्या थोपविण्यासाठी पोलिसांकडून जागृती
10:25 AM Nov 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी पोलिसांनी जागृतीची मोहीम हाती घेतली आहे. येथील जिल्हा ट्रेझरी कार्यालयासमोर अधिकाऱ्यांनी चोऱ्या टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याविषयी मार्गदर्शन केले. एपीएमसीच्या पोलीस उपनिरीक्षक त्रिवेणी नाटीकर, उपनिरीक्षक सरदारगौडा मुत्तट्टी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, जयश्री देवलापूर, कमला नानण्णवर, बी. एम. नरगुंद, गोविंद पुजारी आदी यावेळी उपस्थित होते. पोलीस व सरकारी वसतिगृहातील गैरसोयी दूर कराव्यात, नादुरुस्त खिडक्या दुरुस्त कराव्यात, या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा मागण्या नागरिकांनी केल्या.
Advertisement
Advertisement