महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अंगणवाडी सेविका-आशा कार्यकर्त्यांकडून डेंग्यूबाबत जागृती

10:51 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जिल्ह्यात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत जनजागृतीचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनमानसात डेंग्यूबाबत जनजागृती केली जात आहे. दरम्यान पाण्याचा जास्तकाळ साठा करू नये, आपल्या परिसराची स्वच्छता ठेवावी, अशा सूचनाही करण्यात येत आहेत. डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य खात्याकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूबाबत जनजागृतीचे काम अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांवर सोपविण्यात आले आहे. डेंग्यूबाबत सरकारनेही खबरदारी घेतली असून झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागात मच्छरदानी वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाणीटंचाईमुळे काही भागात अधिक दिवस पाण्याचा साठा करून ठेवला जातो. तसेच आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता नसल्याने या रोगाचा फैलाव वाढू शकतो. यासाठी नागरिकांनी परिसराच्या स्वच्छतेबरोबर पाण्याबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही नागरिकांना केल्या जात आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article