For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भालाफेकपटू अर्शद नदीमवर बक्षिसांची बरसात

06:53 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
भालाफेकपटू अर्शद नदीमवर बक्षिसांची बरसात
Advertisement

पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या धनादेशानंतर पंतप्रधानांची घोषणा, मिळाले 8 लाख 97 हजार डॉलर्स

Advertisement

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

ऑलिम्पिकमधील भालाफेकीतील सुवर्णपदक विजेता अर्शद नदीमला मंगळवारी एकूण 250 दशलक्ष ऊपये म्हणजे 8 लाख 97 हजार डॉलर्स मिळाले असून दुसरीकडे, पाकिस्तानने पॅरिस गेम्समधील त्याचा विक्रम साजरे करणे कायम ठेवले आहे.

Advertisement

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी इस्लामाबादमधील या स्टार अॅथलीटचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात नदीमसाठी 150 दशलक्ष ऊपयांचे इनाम (5 लाख 38 हजार डॉलर्स) जाहीर केले. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी मियां चन्नू जिह्यातील एका गावातील नदीमच्या घरी जाऊन 100 दशलक्ष ऊपयांचा (3 लाख 59 हजार डॉलर्स) धनादेश सादर केल्यानंतर काही तासांनी शरीफ यांची ही घोषणा आली.

पॅरिस येथे नदीमने 92.97 मीटर अंतरावर भाला फेकला. हा एक ऑलिम्पिक विक्रम आहे. त्यामुळे ‘पाक 92.97’ हा विशेष नोंदणी क्रमांक असलेल्या नवीन कारच्या चाव्याही नवाज यांनी त्याला दिल्या. नदीमचे प्रशिक्षक सलमान इक्बाल बट्ट यांनाही 5 दशलक्ष ऊपये (18,000 डॉलर्स) देण्यात आले आहेत. वडील रोजंदारीवरील मजूर असलेल्या नदीमसाठी पैशांची घोषणा करताना शरीफ म्हणाले. ‘आज प्रत्येक पाकिस्तानी आनंदित आहे आणि संपूर्ण देशाचे मनोबल गगनाला भिडले आहे’.

नदीम मंगळवारी म्हणाला की, खूप चांगले वाटत आहे. मला तंदुऊस्त राहण्याची आणि एक दिवस जागतिक विक्रम मोडण्याची आशा आहे. नदीम व त्याची आई रझिया परवीन यांच्यासोबतचे छायाचित्र शेअर करताना नवाज यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, आई-वडिलांच्या प्रार्थना एखाद्या व्यक्तीला अशा उंचीवर पोहोचवितात. मंगळवारी नदीम आणि त्याच्या कुटुंबियांना मुलतानहून एका विशेष विमानाने शरीफ यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सहभागी होण्यासाठी इस्लामाबादला नेण्यात आले. नदीमच्या सन्मानार्थ त्याच्या विक्रमी भालाफेकीला दर्शविणारे खास टपाल तिकीटही जारी करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.