For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रोला अवकाश क्षेत्रातील मानाचा पुरस्कार

06:23 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रोला अवकाश क्षेत्रातील मानाचा पुरस्कार
Advertisement

चांद्रयान-3 मोहिमेसाठी ‘एव्हिएशन वीक लॉरेट्स’ने गौरव

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार इस्रोला मिळाला आहे. ‘चांद्रयान-3’ मोहिमेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. इस्रोच्या वतीने भारतीय डिप्लोमॅट श्रीप्रिया रंगनाथन यांनी हा पुरस्कार स्विकारला.

Advertisement

मागील वर्षी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-2 मोहिमेच्या अपयशातून पुढे जात चांद्रयान-3 मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि रोव्हर चालवणारा भारत जगातील चौथा देश ठरला. सोबतच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा हा पहिला देश ठरला, असे पुरस्कार सोहळ्यावेळी जाहीर करण्यात आले. अवघ्या 75 मिलियन डॉलर बजेटमध्ये इस्रोने चंद्रावर लँडिंग केले. तसेच चंद्रावर पाणी आणि सल्फर असल्याची माहिती देखील या मोहिमेतून मिळाली असून ही भारतासह संपूर्ण जगासाठी मोठी कामगिरी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक कामगिरी केली होती. या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला होता. या कामगिरीबद्दल इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला होता. या ऐतिहासिक कामगिरीमुळेच आता भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Advertisement
Tags :

.