For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्नेहा कदमच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कवी भीमराव कोते काव्य पुरस्कार जाहीर

11:43 AM Dec 24, 2023 IST | अनुजा कुडतरकर
स्नेहा कदमच्या काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कवी भीमराव कोते काव्य पुरस्कार जाहीर
Advertisement

नाशिकच्या कवीवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार

Advertisement

ओटवणे \ प्रतिनिधी
नाशिक येथील कवीवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने यावर्षीचे विविध साहित्य प्रकारातील अव्वल पुस्तकांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगावच्या स्नेहा विठ्ठल कदम हिच्या हेतकर्स प्रकाशनने प्रकाशित केलेल्या 'शिल्लक भितीच्या गर्भकोशातून' या काव्यसंग्रहाची कवी भीमराव कोते विशेष काव्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रोख रक्कम दहा हजार रुपये, स्मृती चिन्ह, व सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असुन त्याचे वितरण २१ जानेवारी रोजी नाशिक राजे संभाजी स्टेडियम शेजारी, सिंहस्थनगर सिडको येथील मायको हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते होणार आहे.स्नेहा कदम हिच्या 'शिल्लक भितीच्या गर्भकोशातून' या काव्य संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिका तथा मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. वंदना महाजन यांच्या हस्ते झाले होते. दलित पँथरचे जे. बी. पवार, ज्येष्ठ लेखिका 'आयदानकार' उर्मिला पवार, डॉ. प्रकाश मोगरे, आशालता कांबळे, प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. प्रतिभा आहिरे, प्रतिमा जोशी या मान्यवर साहित्यिकांनी या काव्यासंग्रहास गौरविले आहे. सम्यक साहित्य परिषद व अपरांत साहित्य कला प्रबोधिनी, प्रसंवाद परिवारातर्फे स्नेहाचे विशेष कौतुक करण्यात आले होते.
बालपणापासूनच साहित्य वाचन, लेखनाची आवड जोपासणाऱ्या व व्यवसायाने इंजिनियर असणाऱ्या स्नेहा कदम हिला ज्येष्ठ साहित्यिक तथा कोमसापचे संस्थापक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, सुनील हेतकर यांची सातत्याने प्रेरणा मिळाली. तसेच आरती मासिक, कोमसाप, सिंधुदुर्ग साहित्य संघ, सिंधुदुर्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंच, महाराष्ट्र यांनीही प्रेरणा दिली आहे. स्नेहा हिच्या या काव्यसंग्रहाची कवी भीमराव कोते विशेष काव्य पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल तिचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.