‘आवारापन 2’चा ट्रेलर प्रदर्शित
प्रेमासाठी लढताना दिसणारा इमरान हाश्मी
2007 साली प्रदर्शित चित्रपट ‘आवारापन’मधील अभिनयाद्वारे इमरान हाश्मीने प्रेक्षकांना अचंबित करून सोडले होते. चित्रपटाची कहाणी अन् गाणी अद्याप प्रेक्षकांना आठवतात, चित्रपटाची वेगळीच फॅन फॉलोइंग आहे. आता निर्मात्यांनी आवारापन 2 चित्रपट निर्माण केला असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
प्रेमासाठी काहीही करण्याची कहाणी ट्रेलरमध्ये दिसून येते. इमरान हाश्मी अन् दिशा पाटनीदरम्यान केमिस्ट्री देखील कमाल दिसून आली आहे. ट्रेलरमध्ये इमरानचे अॅक्शनदृश्य प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे आहेत. ‘मौत से मेरा पुराना रिश्ता, उसका एक कर्ज है, जो चुकाना है’ असा संवाद त्याच्या तोंडी आहे. ट्रेलरमध्ये शबाना आझमी देखील दिसून येत असून त्या नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारत आहेत.
आवारापन 2 चित्रपटात इमरान हाश्मी, दिशा पाटनी, शबाना आझमी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितिन कक्कड यांनी केले आहे. तर हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित चित्रपट ‘आवारापन’चा सीक्वेल आहे.