For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आवळेगावात भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पुढाकार

02:47 PM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
आवळेगावात भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा पुढाकार
Advertisement
कुडाळ : भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि देश घडविण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथे भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन व्हावे आणि समाजात प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठेची भावना रुजावी, या उद्देशाने भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आवळेगाव हायस्कूल व कला-वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय तसेच सिग्मा करिअर अकॅडमी यांच्या सहकार्याने विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

Advertisement

या रॅलीमध्ये आवळेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक दशरथ काळे, शिक्षक धुमाळे, पालव, कांबळे, लिपिक वेदांश सावंत, सिग्मा करिअर अकॅडमीचे संचालक संदेश ठाकूर, सविता पाताडे, क्रीडा शिक्षक राहुल तसेच विद्यार्थी सहभागी झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यंदा २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 'सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे' ही या वर्षाची संकल्पना आहे. भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र आणि देश निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा. सत्यनिष्ठा हीच समृद्ध समाजाची खरी ताकद असल्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

Advertisement

यावेळी लाच मागणाऱ्या किंवा भ्रष्टाचारासंबंधी तक्रार असलेल्या नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १०६४, संपर्क क्रमांक ०२३६२-२२२२८९ आणि व्हॉट्सॲप क्रमांक ९९२२८९१०६४ यांची माहिती जनजागृती फलकांद्वारे देण्यात आली.

Advertisement
Tags :

.