For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांबाबत निकालाची प्रतिक्षा

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्रिजभूषण यांच्यावरील आरोपांबाबत निकालाची प्रतिक्षा
Advertisement

महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण प्रकरण : 26 एप्रिलपर्यंत निर्णय राखून

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात भाजप खासदार आणि ‘डब्ल्यूएफआय’चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्याच्या आदेशाला दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी न्यायालय 26 एप्रिल रोजी पुढील सुनावणी घेणार आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आरोप निश्चित करण्यासाठी आणि पुढील तपासासाठी नवीन अर्ज दाखल करत सदर घटनेच्या दिवशी आपण भारतात नव्हतो, असा दावा केला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनी 7 सप्टेंबर 2022 या घटनेच्या कथित तारखेदिवशी आपल्या डब्ल्यूएफआय कार्यालयातील उपस्थितीबाबत चौकशी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. ज्यादिवशी डब्ल्यूएफआय कार्यालयात महिला कुस्तीपटूचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला त्या तारखेला आपण देशाबाहेर होतो, असे सांगत त्यांनी अर्जासोबत पासपोर्टची प्रत दिली असून त्यावर इमिग्रेशनच्या तारखेचा शिक्का मारलेला आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशचे कैसरगंजचे खासदार आणि डब्ल्यूएफआयचे (रेसलर फेडरेशन ऑफ इंडिया) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग गुऊवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयात पोहोचले. लैंगिक छळप्रकरणी ब्रिजभूषण यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालय आपला निकाल देणार होते. तथापि, 7 सप्टेंबर 2022 रोजी घटनेच्या वेळी आपण दिल्लीत नव्हतोच, असा दावा ब्रिजभूषण यांनी केल्यामुळे या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. त्यांनी सीडीआरची प्रतही मागितली आहे. युक्तिवादानंतर न्यायालयाने 26 एप्रिलपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे. ब्रिजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून 2009 पासून सतत खासदार आहेत. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी जून 2023 मध्ये ब्रिजभूषण विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. कलम 354, 354-ए, 354-डी आणि 506 अंतर्गत त्याच्यावर आरोप दाखल करण्यात आले. या मुद्यावर पहिल्यांदा 18 जानेवारी 2023 रोजी कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह 30 हून अधिक कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतरमंतरवर निदर्शने केली होती. क्रीडा मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन मागे घेतले होते. तसेच याप्रकरणी चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. तथापि, एप्रिल 2023 मध्ये कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा विरोध सुरू केल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी कुस्तीपटू न्यायालयात गेल्यानंतर आदेशानुसारच दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.

Advertisement
Tags :

.