For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अव्वल, डिंगडाँग, शिवाजी तरुण मंडळ विजयी

10:06 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
अव्वल  डिंगडाँग  शिवाजी तरुण मंडळ विजयी
Advertisement

महांतेश कवटगीमठ क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : महांतेश कवटगीमठ स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित महांतेश कवटगीमठ दुसऱ्या निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत अव्वल संघाने वेव वॉरियर्सचा, शिवाजी तरुण मंडळाने ए.के.स्टार व हनुमान स्पोर्ट्स-खडीमशिन यांचा तर डिंगडाँगने साईराज वॉरियर्सचा पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. सामनावीर म्हणून समर्थ, समीर, परसु, शोहेब कुरेशी यांना गौरविण्यात आले.

सरदार्स मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात अव्वल स्पोर्ट्सने 8 षटकांत 4 गडी बाद 77 धावा केल्या. समर्थने 4 चौकारांसह 17, शोहेबने नाबाद 15 धावा केल्या. वेव स्पोर्ट्सतर्फे उमेश व जुनेद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेव वॉरियर्सने 8 षटकांत 6 गडी बाद 59 धावा केल्या. जावेदने 3 षटकार 2 चौकारांसह 22, अन्सरने 16 धावा केल्या. अवनतर्फे ओमकारने 15 धावांत 3 तर समर्थने 1 गडी बाद केला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 7 गडी बाद 92 धावा केल्या. अर्जुन भोसलेने 3 षटकार, 1 चौकारासह 23 तर शोहेबने 1 षटकार, 2 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या. एके स्टारतर्फे मेहबुबने 20 धावांत 2 तर दीपकने 22 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एके स्टारने 8 षटकांत 9 गडी बाद 62 धावा केल्या. पिंटूने 2 षटकार, 2 चौकारांसह 24 तर शामने 15 धावा केल्या. शिवाजी तरुण मंडळातर्फे समीर यळ्ळूरकरने 8 धावांत 3 तर अनिलने 16 धावांत 2 गडी बाद केले.

तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 7 गडी बाद 91 धावा केल्या. मदन बेळगावकरने 1 षटकार 3 चौकारांसह नाबाद 28, संतोष जाधवने 1 षटकार 3 चौकारांसह 27 धावा केल्या. डिंगडाँगतर्फे संकेतने 11 धावांत 2 तर प्रशांतने 20 धावांत 2 गडी बाद केले. त्यानंतर डिंगडाँगने 8 षटकांत 5 गडी बाद 93 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. विनायकने 1 षटकार, 3 चौकारांसह 25, परसुने 1 षटकार 2 चौकारांसह 18 धावा केल्या. साईराजतर्फे अमोल यल्लुपाचेने 23 धावांत 3 तर शिंदेने 22 धावांत 2 गडी बाद केले.

चौथ्या सामन्यात हनुमान स्पोर्ट्स-खडीमशिनने प्रथम फलंदाजी करताना 6.3 षटकांत सर्वगडी बाद 39 धावा केल्या. गणेश व वेदांत यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. शिवाजी तरुण मंडळातर्फे शोहेबने 10 धावांत 2, जगनने 11 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना शिवाजी तरुण मंडळाने 3 षटकांत 2 गडी बाद 42 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. अर्जुन भोसलेने 2 षटकार, 1 चौकारासह 16, रॉकीने 1 षटकार, 1 चौकारासह 13 धावा केल्या. हनुमान स्पोर्ट्सतर्फे कपिल, आर्केश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

शनिवारचे सामने

  • नेहा मीडीया व के.आर.शेट्टी मंगाई स्पोर्ट्स सकाळी 8.30 वा
  • उमर इलेव्हन जखमंडी व डिंगडाँग सकाळी 10.30 वा.
  • चॉईस इलेव्हन यमकनमर्डी व. अरहान स्पोर्ट्स दुपारी 12.30 वा.
  • चौथा सामना पहिल्या सामन्यातील विजेता वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता दुपारी 2.30 वा.
Advertisement
Tags :

.