For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणचा अनावश्यक प्रवास टाळा!

06:31 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणचा अनावश्यक प्रवास टाळा
Advertisement

तेहरानमधील भारतीय दूतावासाचे नवे दिशानिर्देश

Advertisement

 वृत्तसंस्था, तेहरान

अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कमी करण्याच्या कूटनीतिक प्रयत्नांदरम्यान तेहरान येथील भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले आहेत. दूतावासाने बुधवारी जारी दिशानिर्देशांमध्ये सर्व भारतीयांना इराणचा अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Advertisement

दूतावास तेहरानमध्ये सुरक्षेच्या वर्तमान स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच इराणचा प्रवास करावा. इराणसाठी प्रवास करण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जारी करत आहोत, असे दूतावासाने म्हटले आहे. सद्यकाळात इराणमध्ये राहणारे भारतीय नागरिक आणि ज्यांना इराणचा प्रवास करणे आवश्यक आहे, अशा लोकांनी सुरक्षेबद्दल काळजी घेणे, सदैव सतर्क राहणे आणि सातत्याने जागरुकता राखावी असा सल्ला दिला जात आहे. तसेच इराणमध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे स्वत:ची माहिती नोंदवावी. पुढील सूचना आणि कुठल्याही प्रकारच्या दिशानिर्देशांसाठी दूतावासाची अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर नजर ठेवावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

संपर्क क्रमांक जारी

दूतावासाने आपत्कालीन मदतीसाठी 4 मोबाइल क्रमांक आणि एक ईमेल अॅड्रेसही जारी केला आहे. या मोबाइल क्रमांकावर कॉल करत दूतावासाकडून मदत मिळविली जाऊ शकते.

तणाव कायम

अनेक महिन्यांचा संघर्ष समाप्त करण्याच्या उद्देशाने अलिकडेच घोषित करण्यात आलेल्या करारावरून इराण आणि अमेरिकेदरम्यान अद्याप भरपूर मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच केलेल्या एका वक्तव्यामुळे इराण चर्चेतून माघार घेऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. तर इस्रायलकडून लेबनॉनमध्ये अद्याप कारवाई सुरूच राहिल्याने तणाव अद्याप निवळलेला नाही.

Advertisement
Tags :

.