Shirol Barrage | शिरोळ-कुरुंदवाड मार्गावरील प्रवास टाळा! बंधारा फुटल्याने प्रशासनाचा नागरिकांना हायअलर्ट
कोल्हापुर - पंचगंगा नदीवरील शेवटच्या आणि महत्त्वाच्या शिरोळ बंधाऱ्याला मोठं भगदाड पडलं आहे. पाण्याचा प्रचंड दबाव वाढल्यामुळे बंधाऱ्याची उत्तरेकडील बाजू वाहून गेली असून, मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्याचे बरगे काढण्यात आले नव्हते, याच बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बंधारा फुटल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिरोळ, कुरुंदवाड आणि बहीरेवाडी या गावांना जोडणारी वाहतूक प्रशासनाकडून तात्काळ थांबवण्यात आलीये....नागरिकांना या मार्गावरून प्रवास न करण्याचे आवाहन करण्यात आले असून
पावसाळ्यापूर्वी बरगे न काढल्याचा फटका?
दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नदीवरील बंधाऱ्यांचे बरगे (लोखंडी दरवाजे) काढणे अत्यंत आवश्यक असते, जेणेकरून पुराच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा आणि बंधाऱ्यावर ताण येऊ नये. मात्र, या वर्षी प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी शिरोळ बंधाऱ्याचे बरगे काढलेच नव्हते, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाच्या याच बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारामुळे पाण्याचा दाब वाढला आणि शेवटी बंधारा फुटला, अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.