महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आवेश, अकिब यांची दमदार कामगिरी, पोरेलचे अर्धशतक

06:16 AM Sep 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / अनंतपूर

Advertisement

2024 च्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या अंतिम फेरीतील सामन्यात आवेश खान आणि अकिब खान यांच्या दमदार कामगिरीने इंडिया अ संघाची स्थिती थोडी भक्कम झाली आहे.

Advertisement

या सामन्यातील शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाखेर इंडिया क ने पहिल्या डावात 64 षटकात 7 बाद 216 धावा जमविल्या. तत्पूर्वी इंडिया अ संघाचा पहिला डाव 90.5 षटकात 297 धावांत आटोपला. इंडिया क संघ अद्याप 81 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 3 गडी खेळावयाचे आहेत.

इंडिया अ संघाचा पहिला डाव 90.5 षटकात 297 धावांत आटोपला. इंडिया अ संघातील वेगवान गोलंदाज आवेश खानने 68 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा झोडपल्या. रावतने 124, मुलानीने 44 तसेच प्रसिद्ध कृष्णाने 34 धावा जमविल्या. इंडिया क संघातर्फे विशाखने 51 धावांत 4 तर कंबोजने 49 धावांत 3 तसेच गौरव यादवने 57 धावांत 2 गडी बाद केले. आवेशखान आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी 42 धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली.

इंडिया क च्या पहिल्या डावात अभिषेक पोरेलने 82 धावा जमविल्या. नारंग 35 धावांवर खेळत आहे. इंडिया अ संघातील वेगवान गोलंदाज अकिब खानने इंडिया क ची आघाडीची फळी झटपट गुंडाळली. त्याने इशान किसनला 5 धावांवर  तसेच साई सुदर्शनला 17 धावांवर बाद केले. इंडिया क ची यावेळी स्थिती 3 बाद 39 अशी केविलवाणी झाली होती. पोरेल आणि बाबा इंद्रजित यांनी 51 धावांची भागिदारी केली. बाबा इंद्रजित 34 धावा जमविल्या असताना तो दुखापतीमुळे निवृत्त झाला. मुलानीने पोरलला बाद केले. मुलानीने 4 चेंडूत 2 गडी बाद केल्याने इंडिया क ची स्थिती 6 बाद 165 अशी झाली होती. त्यानंतर नारंग आणि विशाख यांनी सावध फलंदाजी केली. नारंग 35 तर विशाख 14 धावांवर खेळत आहे. इंडिया अ तर्फे अकिबखानने 43 धावांत 3 तर मुलानीने 30 धावांत 2 गडी बाद केले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात इंडिया क 9 गुणांसह आघाडीवर असून इंडिया ब 7 गुणांसह दुसऱ्या, इंडिया अ 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक : इंडिया अ प. डाव 90.5 षटकात सर्वबाद 297 (रावत 124, आवेश खान नाबाद 51, मुलानी 44, प्रसिद्ध कृष्णा 34, विशाख 4-51, कंबोज 3-49, यादव 2-57), इंडिया क प. डाव 64 षटकात 7 बाद 216 (पोरेल 82, नारंग खेळत आहे 35, अकिब खान 3-43, मुलानी 2-30)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article