‘अव्हेंजर्स डूम्सडे’चा ट्रेलर प्रदर्शित
बहुप्रतीक्षित चित्रपट ‘अव्हेंजर्स : डूम्सडे’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. डॉक्टर डूमशी लढण्यासाठी क्रिस हेम्सवर्थ अन् मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स अन् इतर सुपरहिरो परतले आहेत. पहिल्या ट्रेलरमध्ये मागील मार्वल आणि एक्स-मॅन चित्रपटामंधील अनेक प्रसिद्ध पात्रं दिसून येतात.
एव्हेंजर्स सीक्वेलच्या ट्रेलरमध्ये एक मोठी टीम दाखविण्यात आली आहे. हे लोक जग वाचविण्यासाठी एकजूट होत आहेत. थोर (क्रिस हेम्सर्थ) खऱ्या लीडरची भूमिका बजावत असतो. जर आपण सर्व एकत्र उभे ठाकलो नाही, तर मागील त्याग निष्कळ ठरेल असा इशारा थोर देतो. तो या सर्वांना स्वत:च्या छोट्या-मोठ्या लढाया विसरून लढण्याची सूचना करतो.
हा ट्रेलर एक जबरदस्त रीयुनियनसोबत समाप्त होतो, ज्यात थोरचा सामना स्वत:चा जुना मित्र स्टीव रोजर्सशी होतो. थोरला ‘डूम’चा सामना करतानाही यात दाखविण्यात आले आहे. नव्या फँटास्टिक फोरपासून पॉल रुडचा एंट मॅन, फ्लोरेन्स पुघची येलेना, द वकंदन्स आणि मूळ एक्स-मॅनच्या वापसीपर्यंत डूम्सडेची सुपरहीरो कास्ट अत्यंत हिट आहे. हा चित्रपट 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाची कहाणी मायकल वाल्ड्रॉन आणि स्टीफन मॅकफीली यांनी लिहिली आहे. डूम्सडेची कहाणी सिक्रेट वॉर्सच्या पुढील दुव्यात समाप्त होईल. पुढील चित्रपट 2028 मध्ये प्रदर्शित होणार आहे. रुसो ब्रदर्स सिक्वेलचे दिग्दर्शन करणार आहेत.